Sunday, 24 May 2020

मैत्री करताना लक्षात ठेवाव्यात या गोष्टी



येषां त्रीण्यवदातानि विद्या
 योनिश्च कर्म च।
ते सेव्यास्तैः समास्या हि शास्त्रेभ्योपि गरीयसी।।

महाभारता मध्ये लिहिलेल्या या श्लोकाच्या अनुसार सांगितले गेले आहे की कोणत्या प्रकारच्या व्यक्ती सोबत मैत्री केल्यामुळे फायदा होतो.
या श्लोकाच्या अनुसार व्यक्तीने फक्त त्याच व्यक्ती सोबत मैत्री केली पाहिजे ज्या व्यक्तीमध्ये खाली दिलेले गुण असतात.

-----------------------------------
मैत्री करताना लक्षात ठेवाव्यात या गोष्टी
--------------------------------------

१) किती ज्ञानी आहे
व्यक्तीने नेहमी ज्ञानी लोकांच्या सोबत मैत्री केली पाहिजे. कारण ज्ञानी लोकांच्या सोबत राहिल्यामुळे व्यक्तीला अनेक चांगल्या गोष्टी शिकण्यास मिळतात. ज्ञानी मित्र तुम्हाला नेहमी आपल्या जीवना मध्ये योग्य मार्ग दाखवतात आणि शिक्षित लोकांच्या सोबत राहण्यामुळे आपल्या जीवनाचा स्तर उंचावतो. तर तुम्ही मूर्ख आणि अशिक्षित व्यक्ती सोबत मैत्री केल्यामुळे काहीही नवीन शिकण्यास मिळत नाही आणि तुम्ही देखील त्यांच्या प्रमाणे मूर्ख बनायला लागतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही कोणत्याही व्यक्ती सोबत मैत्री करता त्यावेळी हे आवश्य पहा कि ती व्यक्ती किती शिकलेली आहे आणि कोणत्याही गोष्टीला समजून घेण्याची त्याची क्षमता किती आहे.
२) कुटुंब कसे आहे
कोणत्याही व्यक्तीच्या संगोपनावर अवलंबून असते कि ती व्यक्ती मोठ्यापणी चांगली व्यक्ती बनेल का वाईट. कुटुंबातील व्यक्तीच्या कडूनच व्यक्तीला चांगल्या किंवा वाईट गोष्टींची ओळख होते. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही कोणाही सोबत मैत्री कराल तेव्हा पहा कि त्याचे कुटुंब कसे आहे. जर कुटुंबातील लोक प्रामाणिक आहेत आणि मुलांना चांगल्या गोष्टी शिकवतात तर त्वरित अश्या लोकांशी मैत्री करा. ज्या व्यक्ती सोबत तुम्ही मैत्री करत आहात अश्या व्यक्तीचे कुटुंबीय पापी आहेत आणि आपल्या मुलांना वाईट गोष्टी शिकवतात तर अश्या व्यक्ती सोबत तुम्ही मैत्री करू नका. कारण व्यक्ती स्वतः कितीही चांगला असला तर त्याच्या कुटुंबीयांच्या सवयीमुळे आणि कर्मा मुळे त्यास देखील जीवनामध्ये संकटांचा सामना करावा लागू शकतो.
३) सवयी आणि काम
व्यक्ती कितीही ज्ञानी असला आणि त्याच्या सवयी वाईट असल्या तर अश्या व्यक्ती पासून लांब राहण्यातच बुद्धीमानी आहे. वाईट व्यक्तीच्या सोबत मैत्री केल्याने त्याच्या वाईट सवयीचे तुमच्यावर परिणाम होतो आणि तुम्ही देखील त्याच्या सारखे वाईट कामे करायला लागता. जर तुम्ही एखाद्य व्यक्तीला भेटता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक वाईट सवयी दिसल्या तर अश्या व्यक्ती सोबत मैत्री करू नये. कारण त्याच्या वाईट सवयीचे फळ तुम्हाला भोगावे लागू शकते.
धार्मिक ग्रंथ वाचण्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींचे ज्ञान मिळते आणि आपल्या ग्रंथामध्ये अश्या अनेक गोष्टी बद्दल उल्लेख केलेला आहे ज्यांचे पालन केल्यामुळे आपले जीवन चांगले होऊ शकते. महाभारत ग्रंथा मध्ये आपल्याला मैत्री बद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि या गोष्टी लक्षात ठेवून व्यक्तीने दुसऱ्या व्यक्ती सोबत मैत्री केली पाहिजे. महाभारता अनुसार मैत्री करतांना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे या बद्दल पुढील प्रमाणे माहिती दिलेली आहे.
------------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
------------------------------------------------

No comments:

Post a Comment