Saturday, 30 May 2020

नर्मदा : अनंतकाळ ची माता!


_____________________
नर्मदा : अनंतकाळ ची माता!
----------------------------

संपूर्ण सृष्टि ही जलाने व्यापली गेली आहे. साक्षात प्रती दत्त म्हणून ओळखले जाणारे श्री परम पवित्र अशा गुरुचरित्रात पहिल्या काही अध्यायात "हे जग सर्वप्रथम जलमय गोळा होते" असे , विधान स्पष्ट आढळते, तसेच गुरुचरित्रातील पंधराव्या अध्यायात भूमंडलास लाभलेल्या पवित्र अशा सर्व तिर्थां धिकांचे सुशब्दात, वेदांतवेद्योऽवतु वाक्यात वर्णन केले आहेत. त्यात अगम्य अशा सर्व नद्यांचे महत्त्व नामधारकास सांगितले आहे.
आपल्या सारख्या दत्तप्रेमींसाठी ही खऱ्याखुऱ्या अर्थाने परवणी म्हणावी लागेल, की ज्या नदी काठी साक्षात दत्तरायांच्या अवतारी पुरुषानी अनुष्ठाने , अनुग्रहे केली होती त्या नदीपात्रांचे दर्शन आपणास ह्या अवघ्या कलीयुगात होत आहे. 
या सर्व ईतिहास स्वरुपी काबाडकष्टाचे कारण म्हणजेच आजचा लेखणीचा विषयही तोच आहे. 
दत्तरायांचे नाव घेताच नयनांसमोर उभी ठाकते ती म्हणजे त्यांच्याच नयनां समोरुन व्हाणारी नदी! 
" नर्मदे हरं !! " हा असा जयघोष कानावर पडताच आठवते ती म्हणजे नर्मदा मैय्या. अनाथा जरी हिच्या काठावर येऊन बसला तरी सुद्धा आपली आई आपल्या समोरच आहे, ती आपल्याकडे पाहातते आहे, आपल्याशी बोलते आहे, असा भास त्या मनुष्यास होतो ; मग अनाथा लाही वाटत की सर्वात भाग्यशाली आपणच आहोत! अशी ही नर्मदा माता !! 
मगरीचे जरी आसन धारण करत असली तरी सुद्धा हिच्या मांडीवर बसणाऱ्या प्रत्येक दत्त साधकाला आपण फुलांपेक्षाही अधिकाधिक कोमल अशा अासनानर बसलोय का काय असा भास व्हावा! 
नर्मदा मातेचा विस्तार तसा मोठा आहे, तिचे पात्रही तसे खोल आहे. 
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या नर्मदा मैयाकडे आपण देहभान विसरून पाहावे असे प्रत्येकालाच वाटते . माते कडे जरी अखंड देण्यासाठी असले तरीही पाहणाऱ्याला काहीही मागायचा मोह न व्हावा अशी तिची खासियत आहे. हिच्याच कुशीत वसलेले प्रसिद्ध असे क्षेत्र म्हणजेच गरुडेश्र्वर. अंगावर छाटी आणि हातात योगदंड ह्या ईतक्याच मुलभूत गरजा असलेल्या वासुदेवनंद टेंबे स्वामींनाही जिच्या सानिध्याचा मोह पडावा अशी ही नर्मदा  मैय्या! आणि ह्या आईचे भाग्य तरी कोणत्या शब्दात वर्णनावे ज्या अदभुत असामान्य अवतारीपुरुषानी दत्त संप्रदायाचा प्रचार अनन्यसाधारण पणे केला त्या थोरल्या महाराजांनी हिच्याच कवेत जलसमाधी घ्यावी! 
जग भरातील दत्तप्रेमी मातेच्या सान्निध्यात चार दिवस राहण्यास येतात, आईकडून लाड पुरवून घेतात , आईकडून शांततेचे, समंजसपणाचे, प्रेमाचे धडे घेतात. 
संथ वाहणारी नर्मदा मैय्या आपल्या लेकरांना पाहता क्षणी त्यांना भेटावयास वेगाने येते,नर्मदा परिक्रमा करणारे भाविक आपलीच माय समजून तिच्या हातात हात देउन तिच्याच काठाने चालत असतात. काठ सोडल्यावर आपण आईच्या पात्रात व्हाईलेले श्रीफळ तिच्या पदरावर अलगदपणे, डुलत असते  शांत अशा मंद वाहणाऱ्या चंदन सुवासाशी गप्पाष्टक होत असते. 
निरपेक्ष पणे दान करणारी ही नर्मदा माता आज काही ठिकाणी दुखावली गेली आहे (मुद्दामच "प्रदुषित" हा शब्द वापरत नाही आहे, कारण आता पर्यंत जिला आई म्हणून संबोधलं तिच्या साठी हा शब्द अपमानास्पद ठरेल) 
ज्या आईच्या लाडप्रेमासाठी आपण तिच्या काठावर जमतो, आरती करतो , हसतो, खेळतो त्याच आईचे बोट आपण मध्येच सोडून कसं चालेलं. जसे आपण "नर्मदा परिक्रमा" करण्यासाठी भाव भक्तिपुर्ण पणे जातो तसेच  "नर्मदा सुरक्षा " ह्या परिक्रमेसाठी सुद्धा त्याच भाव भक्तिने, उल्हासाने गेले पाहीजे.
काय कमालीची गोष्ट आहेना , नयनातून अश्रू व्हाणारी नर्मदा मैया आपल्याला कधीच दिसणार नाही!! 
शेवटी काहीही झाले तरी सुद्धा आपण जशी नर्मदा मैया अनुभवली जशी आईची माया अनुभवली तशीच ती पुढच्या पिढीने देखील अनुभवली पाहीजे. 
_______________________
सुनंदन कृष्णराव राऊळ 
मुंबई गोरेगाव 
२१/०५/२०२०
_________________________
*सुचना*:-
*कृपया आपण शेअर करतांना नाव न बदलता याच नांवाने शेअर करणे*🙏🏻💐

No comments:

Post a Comment