--------------------------------------
श्री वेणूगोपाल स्वामी मंदीर
-----------------------------------------
भगवान श्रीकृष्ण यांचे ईःस १२ व्या शतकात होयसाला राजवंशाने बांधलेल मुळ मंदीर ५० एकर जागेवर उभे होते. सन १९०९ साली म्हैसूरचे राजे यानी कृष्णराज सागर धरण बांधायला घेतले व त्याची जबाबदारी भारतरत्न एम विश्वेस्वरया यांच्यावर सोपवली. धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये हे संपूर्ण मंदीर व आसपासची गावे जात होती त्यावर राजाने गावे पुर्नेस्थापीत करण्याचा निर्णय घेतला व मंदीर पाण्यात गेले. ज्या ज्या वेळेस धरणातील पाण्याची पातळी कमी झाली किंवा दुश्काळ पडल्यावर या मंदीराचे दर्शन घडे, अशा प्रकारे ७० वर्ष पाण्यात राहील्यानंतर या मंदिराचे पुर्नजीवन करण्याचे ठरवीले व मुळ जागेपासून एक की.मी उत्तरेला हे सुंदर मंदीर पुन्हा पुर्नेस्थापीत केले.
मुळ मंदिराचे जवळपास १६००० फोटो व व्हीडीओ काढले गेले व प्रत्येक दगड स्लॅब याना नंबर, मार्कींग करुन नवीन मंदीर २००० ते २०११ सालात उभरले गेले.
येथील श्रीकृष्णाची मुर्ती ही वेणूगोपाल स्वरूपात आहे यामध्ये श्रीकृष्ण बासरी वाजवत आहे व आसपास गाईंचा कळप आहे.
ह्या देवळाचे विशेष म्हणजे,ह्यात ७—८ सभाग्रुह आहेत,प्रत्येक सभाग्रुहाच्या छता मध्ये केळी फुला पासुन केळ्या पर्यंत दगडात कोरीव काम केले आहे तसेच वेणुगोपाल मुर्ती फक्त क्रुष्णाची नसुन क्रुष्ण झाडा खाली उभा राहुन वेणु(बासरी) वाजवत आहे अवती भोवती गाई ऊभ्या राहून ऐकत आहेत.
-----------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
-----------------------------------------------

No comments:
Post a Comment