Saturday, 6 June 2020

मुक्तगिरी धाम, बेतुल मध्यप्रदेश


-------------------------------------------
या मंदिरात दर अष्टमीला चंदन आणि केशराचा पाउस पडतो
-------------------------------------------

भारतात लाखो मंदिरे आहेत आणि लाखोंच्या संख्येने भाविक तेथे दर्शनासाठी जात असतात. भारतातील अनेक मंदिरे केवळ पूजा अर्चेसाठी नाही तर तेथे घडणार्‍या चमत्कारासाठी प्रसिद्ध आहेत आणि हा चत्कार अनुभवण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने तेथे गर्दी करत असतात.

मध्यप्रदेशातील बेतुल जिल्ह्यात सातपुडा पर्वत रंगांच्या मध्ये दाट जंगलात असलेले निसर्गसुंदर मुक्तगिरी धाम हे असेच एक मंदिर आहे. असे सांगतात या मंदिरात दर अष्टमीला चंदन आणि केशराचा पाउस पडतो. हे जैन मंदिर आहे.
याची कथा अशी सांगितली जाते की
 हजारो वर्षांपूर्वी येथे एक मुनी ध्यान करत होते तेव्हा पहाडावरून पडल्याने एक बेडूक मरण पावला. या बेडकाच्या कानात मुनींनी मंत्राचा जप केला तेव्हा तो स्वर्गात देवलोकात पोहोचला. त्यावरून या पर्वताला मेढागिरी पर्वत असे नाव पडले. असे सांगतातकी स्वर्गात गेलेला हा बेडूक मुनींची भेट घेण्यासाठी येथे आला तेव्हा चंदन आणि केशराचा पाऊस पडला आणि दर अष्टीला असा पाऊस येथे पडतो. या पर्वत रांगात लहान मोठी ५२ मंदिरे असून त्यात मुक्तगिरी सर्वात प्रसिद्ध आहे. या मंदिरात जाण्यासाठी ६०० पायर्‍या चढाव्या लागतात.
----------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
-----------------------------------------------

No comments:

Post a Comment