Tuesday, 2 June 2020

मंत्राचे सामर्थ्य


----------------------
मंत्राचे सामर्थ्य
-----------------------

मंत्रामध्ये अपार सामर्थ्य असतं. त्यांची संख्या महाप्रभूच्या असीमिततेएवढी आहे. सर्व मंत्रांच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. प्रत्येक मंत्रापासून वेगवेगळी फळप्राप्ती होते. मंत्रांचा प्रभाव जो उच्चारतो त्याच्या वर आणि ज्यासाठी मंत्रोच्चार करीत आहे त्यावर पडतो.
मंत्र दैविक ऊर्जा आणि ज्ञानाने पुरेपूर असतात. पण गुरूच्या कृपेने प्राप्त केलेल्या मंत्राचे परिणामच प्रभावी असतात. त्यासाठी खऱ्या गुरु शिवाय मंत्रांचे योग्य उच्चारण, लय आणि मंत्र जाप या विषयाची माहिती मिळणे अवघड असते. खरं ज्ञान आणि योग्य गुरुंनी केलेल्या योग्य पद्धतीच्या मंत्रांचा जाप केल्याने त्याच्या नक्कीच फायदा होतो.

मंत्रांमध्ये चमत्कारिक जागृत शक्ती असते. त्या शक्तीच्या पुरेपूर लाभ घेण्यासाठी त्या मंत्राचे ज्ञान आणि त्याला पूर्ण आणि खऱ्या अर्थाने समजणे आवश्यक आहे. त्या साठी त्याला समजणाऱ्या आणि ज्ञानाची क्षमता असणाऱ्या गुरु कडूनच दीक्षामंत्र घेतले गेले पाहिजे.

मंत्र शब्दाचा असा अनुक्रम आहे ज्याचे उच्चार केल्याने एक विशिष्ट स्पंदन तयार होतात. त्या स्पंदनाचा आपल्या शरीरावर आपल्या विशिष्ट क्षमतेनुसारच परिणाम पडतो. आपले कान शब्दांच्या विशिष्ट प्रकाराच्या लहरींचं ऐकू शकतात. त्या पेक्षा कमी क्षमतेच्या लहरी ऐकू येत नसतात. आपली ऐकण्याची क्षमता एका सेकंदात २० ते २० सहस्र कंपनाची असते. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की इतर लहरी प्रभावी नाही. काही- काही प्राणी त्या लहरींना (तरंगांना) देखील ऐकू शकतात.

उदाहरणार्थ,
 काही प्राणी आणि मासे यांना भूकंप येण्याचे संकेत कळून येतात आणि त्यामुळे त्यांचे वर्तन बदलते. ह्याच सिद्धान्तावर आजची वायरलेस प्रणाली देखील कार्य करते. उदाहरणार्थ रेडियोच्या लहरी आपल्या ओवतीभोवती असतात पण आपल्याला ऐकू येत नाही कारणं त्या इतक्या सूक्ष्म असतात की आपले कान त्यांना पकडू शकण्यात सक्षम नसतात.

ह्याच प्रकारे मंत्रांच्या लहरी पण अजून सूक्ष्म असतात आणि आपल्या ओवतीभोवती त्या पसरतात. आता हे आपल्यावर असते की आपणं त्यांचा स्वीकार कसा करू शकतो.

मंत्रातून निघणाऱ्या सूक्ष्म लहरींच्या व्यतिरिक्त श्रद्धा आणि दृढनिश्चयाच्या लहरी देखील असतात. या मोठ्या आवाजाच्या लहरींच्या व्यतिरिक्त निघणाऱ्या लहरींना आपले कान ऐकू शकत नाही. त्या लहरी आपल्या केसांच्या माध्यमाने आपल्या शरीरांवर त्याच्या प्रभाव टाकतात. मंत्रांच्या सूक्ष्म लहरींचा स्वीकार करताना आपले केस एका वायरलेस तारांप्रमाणे कार्य करतात. त्यांच्या माध्यमातून आपल्या शरीरांमध्ये गेलेल्या त्या सूक्ष्म लहरी आपल्या त्रासाला कमी करतात.

शब्दांचे मेळ एका अर्थपूर्ण वाक्याची रचना करतात. मंत्र प्रभावी करण्यासाठी त्यामधील उद्दिष्ट आणि अभिव्यक्तीचे ज्ञान असणे गरजेचे असते. त्यामधील भावहीन आणि अर्थहीन असल्यास त्या मंत्राचा योग्य प्रभाव दिसून येत नाही.

चुकीचे मंत्र उच्चारल्यामुळे त्याच मंत्रांचा योग्य प्रभाव पडत नसल्याने या ज्ञानावर लोकांचा विश्वास कमी होत आहे. काही लोभी लोकं लोभावश ज्ञानी असल्याचे सोंग करून लुबाडत आहे. खरं तर त्यांना याचे काहीही ज्ञान नसतात. काहींना तर त्या मंत्रांच्या लय आणि उच्चारणांचीही माहितीच नसते.

-------------------------------------------
काही मंत्राचे वैज्ञानिक विश्लेषण
---------------------------------------------

१) ऐक्य मंत्र :-
 ऐक्य मंत्राच्या पठणाने ओक्सिटोसिन नावाचे हार्मोन तयार होते. घरात समाजात मिळून मिसळून एकोप्याने राहण्याची भावना वाढीस लागते.

२) नवार्णव मंत्र :-
 मानवाच्या शरीरातील सर्व चक्रांना जागृत करते. नऊ अक्षरांचा या मध्ये समावेश आहे.
मुलींनी बांगड्या घातल्याने त्यांच्या मनगटातील धमन्या व शिरा active होतात.
रामरक्षा स्तोत्रातील 'र 'च्या उच्चाराने पित्ताशय, पित्त आणि आतड्यांचे काम balance होते.

३) गायत्री मंत्र :-
 गायत्री मंत्राच्या पठणाने इपोनोप्रिन्स (Epinopnrins) नावाचे हार्मोन तयार होते. रोग प्रतिकारक शक्तीची वाढ होते.

४) कालभैरावाष्टक :-
कालभैरावाष्टक स्तोत्राच्या पठणाने विशिष्ट प्रकारचे vibrations तयार होते त्यामुळे आपले ३ इंच पर्यंत संरक्षण होते. मुलांनी गंध टिळा लावल्याने भृकुटीमध्या वरील आज्ञाचक्र active होतात.

५) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र :-
 याच्या पठणाने पिनियल gland ला धक्का बसून मेमरी चार्जेस ची निर्मिती होते. स्मृतीभ्रंश चे आजार होत नाहीत.

६) सरस्वती मंत्र, सुर्य मंत्र, गणपतीअथर्वशीर्ष :-
मेंदू मध्ये cortex नावाचा भाग असतो त्यात Cortizone नावाचे हार्मोन तयार होते. त्यामुळे बुद्धीमत्तेत वाढ होते सदबुद्धी वाढते.

७) विद्याप्राप्तीकारक स्तोत्र :-
 या स्तोत्राच्या पठणाने DHA नावाचे हार्मोन तयार होते. बुद्धीचा योग्य वापर या हार्मोन मुळे होतो.

८) दत्त महाराजांचा मंत्र :-
 "द्रां " हा दत्त महाराजांचा बीजमंत्र आहे. त्याच्या उच्चारणाने (सेल टिश्यू फॉरमेशन ) cell tissue formation चे काम प्रॉपर होते (जखम भरून येण्याचे काम ).

९) शाबरीमंत्र :-
 *Dopamine हार्मोनची निर्मिती होते. विशेष महत्वाचे म्हणजे या हार्मोनचा balance राखला जातो. जर हार्मोन वाढले तर व्यसन गुन्हेगारी व कमी झाले तर नैराश्य.
माहिती संदर्भ :- आंतरजाल
----------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
------------------------------------------------

No comments:

Post a Comment