Saturday 6 June 2020

आवर्जून वाचावं असं काही


आवर्जून वाचावं असं काही👇

लाॅकडाऊनच्या अगोदरची एक घटना अशीच अंतर्मुख करणारी. आमच्या ओळखीतला महेश नावाचा एक तरूण ,
राममंदिरासमोर त्याचं घर होतं. पहाटे साडेचार-पाच पासूनच लोक मंदिरात यायला लागायचे. एक दिवस महेश उठून पाहतो तर काय, रस्त्यावर उभ्या असलेल्या त्याच्या गाडीला मागून कोणीतरी जोरदार धडक दिलेली._
चडफडत महेश गाडीजवळ गेला, नक्की किती नुकसान झालंय ते बघायला, तर काचेवर अडकवलेली एक चिठ्ठी दिसली.
त्यावर एक नाव आणि फोननंबर लिहिलेला होता आणि फोन करण्यास सांगितले होते. महेश घाबरला.
बिचकतच त्याने त्या नंबरवर फोन लावला. पलीकडचा माणूस म्हणाला, ‘‘मी वाटच पाहत होतो तुमच्या फोनची. तुमच्या गाडीला धडक देणारा मीच.
रोजच्याप्रमाणे अगदी लवकर मी काकड आरती करून बाहेर आलो. गाडी सुरू केली पण चुकीचा गियर पडल्यामुळे गाडी मागे जायच्याऐवजी पुढे गेली आणि तुमच्या गाडीवर आदळली. इतक्या पहाटे तुम्हाला कशाला उठवा म्हणून चिठ्ठी ठेवली. मी तुमच्याबरोबर पोलीस ठाण्यात येतो. तुमचं सगळं नुकसान भरून देतो.’’
त्याने सगळं नुकसान भरूनही दिलं, वर खूप वेळा माफी मागत होता. हे सर्व झाल्यावर महेशला काही राहवेना. त्याने विचारलं, ‘‘तुम्हाला धडक देताना कोणीही पाहिलं नव्हतं. तुम्ही आपणहून कबुल कसं काय केलंत ? हे सगळं तुम्ही सहज टाळू शकला असतात.
तो माणूस म्हणाला ...., कोणी बघत नव्हतं कसं ? भगवंत सगळं बघत असतो आणि रोज पहाटे दर्शन घेऊन माझ्या अंगात एवढाही प्रामाणिकपणा नसेल तर माझ्यासारख्या नालायक माणसाला मंदिरात जाण्याचा काय अधिकार ...?
क्या बात है...!!
मला ते गाणं आठवलं-
जग से चाहे भाग ले कोई
मन से भाग ना पाये
भले बूरे सारे कर्मोंको
देखे और दिखाये.....
तोरा मन दर्पण कहलाये…

No comments:

Post a Comment