Wednesday, 19 February 2025

आई जगदंबेची प्रभावी स्तोत्रे


आई जगदंबेची काही प्रभावी स्तोत्रे आहेत त्याबद्दल आपणास सांगतो.

श्री आई जगदंबेचे देवी सुक्त 
हया स्तोत्राचा पाठ केला असता शुभदायी घटना घडतात व संकटाचा नाश होतो, मन शुध्द होते, निर्मिती आणि विशाल व्यापक बनते.

श्री रात्री सुक्तम् 
हया स्तोत्राचा पाठ रोज संध्याकाळी करावा, देवी प्रसन्न होऊन तुमच्यातील तमोगुणाचा, आळस,
नैराश्य दूर करते व दुष्ट शत्रूचा नाश होतो...

श्री दुर्गा कवतम् 
सर्व देव कवचात श्रेष्ठ कवच आहे.
देवी उपासकानी ह्या कवचाचा पाठ केला असता त्यांना देवी कवच एक अभेद्य कवच प्राप्त होते. त्यामुळे सर्व संकटाचे निराकरण होते. तसेच जे देवी उपासक श्री सप्तशतीचे पाठ करतात त्यांनी पाठापुर्वी दुर्गाकवच, अर्गला,किलक स्तोत्राचा पाठ करणे फार महत्त्वाचे असते.

श्री अर्गला स्तोत्रम् 
जय, पत्नी, रुप, यश आणि धनप्राप्ती करुन देणारे हे स्तोत्र सर्व भक्तांनी रोज नित्य त्रिकाळ वाचनात ठेवावे.

श्री भगवत्याः किलकस्तोत्रम्
या स्तोत्राच्या नित्य वाचनामुळे अपमृत्यू ढळतो आरोग्य, सौभाग्य, संपदा प्राप्त करून देणारे आहे.
कृष्णाष्टमी, कृष्ण चतुर्दशीला सकाळ संध्याकाळ वाचन करावे.

कुंजिका स्तोत्रम् 
हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे.
याचे रोज ९ वेळा वाचन केल्यास एका सप्तशती पाठाचे फळ मिळते.
हे स्तोत्र संमोहन, वशीकरण, स्तंभन, उच्चाटन आणि जारण-मारण इत्यादी साठी पठण केले जाते.

श्री महालक्ष्मी स्तोत्रम् 
या नित्य पठणाने देवी उपासकाचे सर्वतोपरी कल्याण होते. तसेच पुत्रप्राप्तीची मनोकामना करणाऱ्यानी हया स्तोत्राचा पाठ रोज सायंकाळी केला तर महालक्ष्मीकृपेनेवुत्तम, सद्गगुणी पुत्रप्राप्ती होते.

वंशवृद्धिकर वंशकवचम् 
ज्यांना मुलेबाळे होत नसतील व संतानप्राप्ती होऊन वंशविस्तारासाठी तर त्यानी रोज हे स्तोत्र एक ग्लासवर पाणी घेऊन त्यावर हात ठेवून हे स्तोत्र सात वेळा म्हणावे व हे तिर्थ समजून स्त्रीने प्राशन करावे.
त्यामुळे गर्भधारणा व गर्भवृध्दी व्यवस्थित होते.सर्व बाधा टळतात.
वंशवेल अर्ध्यावर संपत नाही.

श्री कनकधार स्तोत्रम् 
हे आद्यशंकराचार्यानी हे स्तोत्र लिहलेले आहे. हे स्तोत्र रोज सकाळसंध्याकाळ म्हटले असता धनलक्ष्मी प्राप्ती व सद् भाग्य प्राप्ती होते.

श्री देवी अथर्वशीर्ष 
या अश्विन महिन्यातील नवरात्र उपासनेत हे स्तोत्र आवर्जून म्हटले जाते. हयाच्या शिवाय सप्तशतीचा पाठ करणे फलदायी ठरत नाही.
मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा हया दिवशी हे अवश्य म्हणावे.
हया देव्यथर्वशीर्षाचे एक वार पठण केले तर पूर्वीच्या १२ तासात जाणता अजाणता केलेल्या पापांचा नाश होतो. रोज दहा वेळा हे म्हटले तर संकटापासून सुटका होते. हे स्तोत्र जर १०८ वेळा म्हटले तर त्याचे पुरश्चरण होते.

श्री त्रिपुरीसुंदरम् स्तोत्रम् 
रोज संध्याकाळी देवापुढे तेलवात लावून शांत व प्रसन्न मनाने हे स्तोत्र म्हटले असता ऎहिक सुखाची व मनःशांती प्राप्ती होते.

श्री महालक्ष्मी कवचम् 
रोज नित्य म्हटल्यावर लक्ष्मीमातेच्या कृपेने आपल्याला सौख्य लावावे, सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी
॥"महालक्ष्मीच विद्ममहे।विष्णूपत्नीच धिमही।
तन्नौ लक्ष्मी प्रचोदयात"॥ हा मंत्र म्हणून मग हया कवचावरील वाचन करावे त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन कृपा करते.

श्री महालक्ष्मी अष्टकम् 
हया अष्टकाचे रोज पठण केल्यास त्यामुळे पापमुक्ती होते. तसेच जर हे अष्टक रोज दोनवेळा म्हटले तर संपत्तीलाभ होतो. त्रिकाळ पठण केले तर महाशत्रूसुध्दा नाश होतो.

श्री भवानी अष्टक स्तोत्र 
हया स्तोत्र पठणाने दारिद्रय, दुःख हयाचे निवारण होऊन माता भवानी आईचा कृपाप्रसाद प्राप्त होतो.

श्री दुर्गाष्टशतनामस्तोत्र 
हया श्री दुर्गा देवीच्या १०८ नाम स्तोत्राचे पठण केले असता, भक्ताचे अंगी सद्गगुण वृध्दींगत होतात. सुख समृद्धी व शांती मिळते.

एकश्लोकी सप्तशती 
सप्तशती ही पठण करण्यास फार अवघड आहे. संपूर्ण सप्तशती हा ग्रंथ सर्वानाच सहज वाचायला जनतेच्या असे नाही. म्हणूनच निदान हया एकश्लोकी सप्तशतीचे वाचन करुन भक्तीची फुल ना फुलाची पाकळी तरी त्या शक्ती देवताच्या पायी अर्पण करावी.

सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र
हया स्तोत्राचा पाठ केल्यावर देवी ज्यांच्यावर प्रसन्न होते. त्यांच्या संकटाचा,आधी व्याधी रोगांचा नाश होतो. सर्व इच्छा पूर्ण होतात. शत्रूचा नाश होतो.

देवीक्षमामापन स्तोत्र 
सामान्य माणूस देवी उपासना करत असताना त्यांच्याकडून साहित्य, उच्चार, मंत्रपठण, स्तोत्र वाचन, पुजापाठ, होमहवन किंवा साधे ग्रंथ वाचन करताना ही अनेकादा काही चुका होतात. काही उणिवा राहून जातात. त्याचा दोष लागू नये व केलेली सश्रध्द व भोळिभाबडी उपासना फलद्रुप व्हावी आणि महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ह्यांनी आओल्यावर कृपा करावी.
आपले अपराध पोटात घालावेत.
आपल्याला क्षमा करावी हयासाठी हे क्षमापन स्तोत्र प्रत्येक लहान मोठया उपासनेनंतर म्हणावे व विनम्रभावे देवीची क्षमा मागावी.

तर आपणास या सर्व स्तोत्राची फलाची माहिती दिली आहे जशी आपणास सेवा करण्यास जमेल तशी करावी...

No comments:

Post a Comment