⚜️बोधकथा - "भव बंधनातून सुटका"⚜️
एक साधु हिमालयातील आश्रमातील प्रवचन करण्यासाठी जात असे.
त्यांच्या प्रवचनाचा विषय असे "भव बंधनातून सुटका" त्याच आश्रमात एक पिंजरा होता.
त्यात एक पोपट असे. एक दिवस काय झाले. जे साधु प्रवचन करायला येत होते, ते त्या दिवशी आले नाहीत. तर त्याचे दोन शिष्य आले. ते त्याच विषयावर प्रवचन देत होते. त्या वेळी पोपट हसु लागला. प्रवचन संपल्यावर, त्या पोपटाला हसण्याचे कारण विचारले,त्यावर तो पोपट म्हणाला, मी गेली सहा महिने झाले. हेच ऐकतोय, भव बंधनातून सुटका, अहो,साधै माझे ह्या पिंजऱ्यातुन सुटका झाली नाही. तुम्ही लोकांना काय सोडवणार. म्हणे,भवबंधनातुन सुटका. शिष्य म्हणाला, तु माझ्या गुरुजी ला बोल,ते तूला ह्या बंधनातुन मुक्त करतील, पण...
पण......काय तुला तुझा अंहकार सोडावा लागेल.
तुला, नम्र व्हावे लागेल, त्यांना प्रणाम करावा लागेल, तु त्यांना शरणागत हो.मग तुझी सुटका होईल. काही दिवसांनी ते साधू आले, पोपटाने त्यांचे प्रवचन लक्षपूर्वक ऐकले, साधू जाऊ लागले. तेव्हा पोपटाने त्यांना प्रणाम केला, तो म्हणाला महाराज, माझ्या वर दया करा, मला ह्या पिंजरयातून बाहेर काढा.
गुरूजी ने त्याच्या कानात सांगितले, उदया तु मालक येईपर्यंत पिंजऱ्यात गप्प पडून राहा, कसलीच हालचाल करु नकोस, मालक आला, पिंजऱ्यात पोपट पडला होता.
मालकाला वाटले, पोपट मेला, त्याने पिंजऱ्यात हात घातला, पोपटाला बाहेर काढले आणि फेकून दिले, तसा तो उडाला. मुक्त झाला.
तात्पर्य: जो पर्यंत मनुष्य जीवनात गुरूचा स्विकार करत नाही, तोपर्यंत तो अज्ञानात राहणार.
कोण सोडवेल ,जी व्यक्ती स्वतः मुक्त आहे, तीच दुसऱ्या ला सोडवू शकते. कारण त्यांनी तत्व जाणलेले असते.

No comments:
Post a Comment