Friday, 29 May 2020

राजा राममोहन रॉय


सतीची चाल कायदेशीरपणे बंद करणारे व अनेक भाषांतून प्रावीण्य मिळविलेले थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांना जयंती निमित्त माझ्यातर्फे विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम...

------------------------------
राजा राममोहन रॉय
------------------------------

राजा राममोहन रॉय एक महान ऐतिहासीक विद्वान म्हणुन ओळखले जातात ज्यांनी भारताला आधुनिक भारतात बदलण्याकरता बराच संघर्ष केला आणि पिढयान पिढयापासुन चालत आलेल्या कुप्रथांना बंद केलं.
समाजात परिवर्तन घडवण्याकरता त्यांनी बरेच समाज उपयोगी कार्य केले आपल्या देशात महीलांची स्थिती मजबुत बनवण्यात त्यांचे योगदान महत्वपुर्ण आहे  रॉय यांनी सती प्रथे विरूध्द उघड उघड विरोध केला, ते एक महान विव्दान होते ज्यांनी ब-याच पुस्तकांचे भाषांतर केले होते.
ब्राम्हो समाजाची स्थापना त्यांनी १८२८ मधे केली  राजनैतिक, सामाजिक, आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं अमुल्य योगदान आहे राजा राममोहन रॉय हे विशेषता हिन्दुंच्या सती प्रथे विरोधात सगळयांना परिचीत आहेत, त्या वेळी बंगाल मधे पती च्या निधनानंतर पत्नी ला सती संबोधले जाई आणि तीला सती जावे लागे.
रॉय यांनी या विरोधानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा देखील विरोध केला आणि भारतात इंग्लिीश ऐवेजी संस्कृत आणि पार्शियन भाषा शिकवण्यावर जोर दिला  १८१६ मध्ये त्यांनीच इंग्रजीत हिन्दुइस्म शब्दाचा शोध लावला  इतिहासात त्यांचे योगदान बघता भारतातील महत्वपुर्ण महापुरूषांमध्ये त्यांची गणना होते ते नेहमी भारताला आणि हिंदुत्वाला वाचवण्याकरता ईस्ट इंडीया कंपनीविरोधात लढा देत राहीले ब्रिटीश सरकारने तर त्यांना भारतीय नवजागरणाचे जनक ही पदवी दिली होती ब्रिटिश सरकार ने त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एका रस्त्याचे नाव बदलुन राजा राममोहन वे असे ठेवले.
----------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
-----------------------------------------------

No comments:

Post a Comment