दत्त माहात्म्यात भगवान परशुरामांनी कार्तवीर्याचा वध केल्यावर तीर्थयात्रा केली. यात सात पुरी आणि चार धामांचा उल्लेख आहे . जमदग्नी ऋषी म्हणाले ,चार धाम पाहे पुत्रा l ज्योतिर्लिंगे बारा l सात पुरी पवित्रा l यांचे दर्शन करावे ll हि तीर्थयात्रा कशी करावी हे जमदग्नी ऋषींनी सांगितलेले आहे का तर कार्तवीर्याच्या वधाने झालेल्या पातकाचे क्षालन व्हावे . तेव्हा अर्थातच याला पाप क्षालनाच्या दृष्टीने खूप महत्व आहे . कोणत्याही एकाच ठिकाणी हि क्षेत्रे नाहीत . चार दिशांना चार धाम आहेत तर सात पुरी ह्या कांचीपुरम वगळता उत्तर भारतात विखुरलेल्या आहेत . केवळ कांचीपुरम हि तामिळनाडू राज्यात आहे .
बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम हे चार धाम . यातील पहिली तीन भगवान विष्णूंची तर रामेश्वरम हे काशी समान दक्षिणेतील भगवान महादेवांचे क्षेत्र . बद्रीनाथ उत्तरेकडे ,द्वारका पश्चिमेकडे ,पुरी हे पूर्वेकडे तर रामेश्वरम दक्षिणेकडे . आचार्यांनी या चारही धामात चार मठांची स्थापना केली . यापैकी वेदान्त ज्ञानमठ - रामेश्वरमला ,गोवर्धन मठ- जगन्नाथपुरीला ,शारदा मठ- द्वारकेला तर ज्योतिर्मठ- बद्रीनाथ येथे स्थापन केला . अनादीकालापासून ख्यातनाम असणाऱ्या या तीर्थक्षेत्राना जाणे चार दिशांमुळे कठीण असले तरी अशक्य नाही .
अयोध्या मथुरा माया काशी काञ्ची अवन्तिका ।
पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाः॥
सात पुरी अर्थात सात प्रमुख नगरे आहेत . पूर म्हणजेच नगर . अयोध्या ,मथुरा ,माया म्हणजेच हरिद्वार ,काशी ,काञ्ची म्हणजेच आताचे कांचीपुरम आणि अवन्तिका म्हणजेच उज्जैन . हि सातही नगरे भगवंताचे कायम सान्निध्य असणारी आहेत . पैकी उज्जैन आणि काशी या क्षेत्रांचा उल्लेख गुरुचरित्रात आला आहेच . यातील केवळ कांचीपुरम दक्षिणेत आहे बाकी सारी नगरे हि उत्तरेत आहेत .
जमदग्नी ऋषींना कार्तवीर्याची योग्यता ठाऊक होती आणि म्हणूनच त्यांनी भगवान परशुरामांना पापक्षालनार्थ हि यात्रा करायला सांगितली .एका हत्येच्या पापक्षालनार्थ जर एव्हडे कष्ट घ्यावे लागत असतील तर पाप क्षालन किती कठीण आहे याचा अवश्य विचार करावा !! श्री गुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य
No comments:
Post a Comment