दत्तात्रेयांना विष्णूप्रमाणे एक मुख व चतुर्भुज म्हटले आहे. श्रीविष्णूंचे चार हात ही संकल्पना
' विष्णूतेथे लक्ष्मी ' यावरून दृढ झाली असावी. म्हणजेच विष्णू वलक्ष्मी या दोघांचे हात मिळून चतुर्भुज ही कल्पना असावी.
ब्रम्हा—विष्णू—महेश या त्रयींचे सहा हात असे दाखवले गेले.अशा रूपाचे वर्णन आज सांप्रदायिकांत मान्य अलेल्या खीलील श्लोकात मिळते.
माला कमंडलुरध:
करपद्मयुग्म ।
मध्यस्थपाणियुगले
डमरू त्रिशुले ।
यस्यस्त ऊर्ध्वकरयो:
शुभशंखचक्रे
वन्दे तमित्रवरदं
भुजषटकयुक्त्तम ।।
ब्रम्हा, विष्णू व महेश यांचा समावेश करणारी तीन मुखे सहा हात : खालच्या दोन हातांत माला व कमंडलू ,मधल्या दोन हातांत डमरू व त्रिशूळ ,वरच्या दोन हातांत शंख आणि चक्र अशा रूपाचे हे वर्णन आहे..
कमंडलू वजपमाळ हे ब्रम्हदेवाचे प्रतीक , शंख व चक्र हे विष्णूदेवतेचे प्रतीक व त्रिशूळ वडमरू हे भगवान शंकराचे प्रतीक आहे.
वक्रत्रयधरं देवं
षडहस्तं नवलोचनम ।
ब्रम्हा—विष्णू—महेशान —रूपिणं प्रणमाम्यहम । ( दत्तात्रेय सर्वस्व२२/१ )
ज्याने तीन मुख धारण केलेली आहेत तसेच ज्याला सहा हात असून नऊ नेत्र आहेत अशा त्या ब्रम्हदेव, विष्णू आणि महेश्वर —स्वरूप असलेल्या अत्रिपुत्र दत्तात्रेयाला मी प्रणाम करतो. एकमुख व द्विभुज दत्तात्रेयांनी अनेकांना अध्यात्मतत्वाचा उपदेश करून कृतार्थ केलेले आहे.
श्रीक्षेत्रपादगया , पीठापूर येथे असलेली स्वयंभू दत्तमूर्ती तीन शिरे चार हात अशी आहे.
तात्पर्य , भगवान दत्तात्रेय हे त्रिमुख व षडभूजही आहेत एकमुख व षडभूजही आहेत, एकमुख व द्विभुजही आहेत आणि द्विमुख दत्तात्रेयही आहेत.
श्रीगुरूदेवदत्त
No comments:
Post a Comment