--------------------
मंदिरांचे प्रकार
----------------------
परंतु काही वेळेस (धार्मिक वगळता) इतर ठिकाणीदेखील मंदिर हा शब्द वापरला जातो. उदा. आरोग्य मंदिर, योग मंदिर, ध्यान मंदिर, विद्येचे मंदिर.
मंदिर हे देवाचे घर समजले जाते. ईश्वर साकार व सगुणच आहे असे मानून येथे मूर्तीची पूजा केली जाते. मंदिरालाच देवालय असे म्हटले जाते
कल्पक भारतीय वास्तुकारांनी भौगालिक परिस्थितीनुसार अनेकविध प्रकारांची सुंदर सुंदर मंदिरे निर्माण केली.
या मंदिरांचे अनेक प्रकार आहेत.
१) विटांची मंदिरे :-
मंदिर बांधणीच्या उपक्रमांमध्ये सुरुवातीला विटांची मंदिरे बांधली गेली. पण शतकानुशतक टिकून राहण्याच्या दृटीने वीट नाशिवंत असल्याने सुरुवातीच्या कालखंडातील विटांची मंदिरे आजमितीस फारच कमी प्रमाणात आढळतात. मांढाळ, रामटेक, तेर येथिल विटांची मंदिरे आजही पाहावयास मिळतात.
२) हेमाडपंथी मंदिरे :-
हा वास्तुरचना आणि कौशल्याचा स्वतंत्र प्रकार आहे.याचे वैशिष्ट्य असे की, या वास्तूच्या उभारणीत सांधे जोडण्यससाठी चुना, माती वापरले जात नाही. मंदिरे विविध प्रकारच्या म्हणजेच त्रिकोणी, चौकानी, वर्तुळाकृती, अर्धवर्तुळाकृती इत्यादी आकाराच्या दगडांनी बांधली जात असत. या दगडांना विशिष्ट ठिकाणी खोबणी असत, त्यांच्या सहाय्याने हे दगड एकमेकांवर बसवून संपूर्ण वास्तू उभी केली जात असे.
३) नागर शैली मंदिरे :-
यांनाच इंडो आर्यन मंदिरे असेही म्हणतात. हा सर्वात प्राचीन हिंदु मंदिरांचा प्रकार आहे.याच्या शिखराचा भाग वर निमुळता होत जाणारा व काहीसा बहिर्वक्र स्वरुपाचा असतो. शिखराच्या मुख्य आकाराच्या वर बसक्या लोट्या प्रमाणे भाग असतो ज्याला "आमलक' म्हणतात. ही मंदिर उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात आढळतात.
४) द्रविड शैली मंदिरे :-
द्रविड हा शब्दच मुळात भौगोलिक प्रदेशाचे सूचक आहे. कृष्णानदी पासून कन्याकुमारी पर्यंतच्या प्रदेशात ही शैली प्रसिध्द होती. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात मंदिराच्या शिखरात मजले बांधलेले असतात. यांनाच "भूमी' असे म्हणतात. ही मंदिरे मोठ्या परिसरात पसरलेली असतात. या मंदिराचा आणखी एक विशेष म्हणजे "गोपूर'.
५) वेसर शैलीची मंदिरे:-
या शैलीची मंदिरे प्रामुख्याने पश्चिम भारतात आढळतात. विंध्यपर्वता पासून कृष्णानदी पर्यंत ही शैली प्रचलित आहे. यात नागर आणि वेसर दोन्ही पध्दतीचा समावेश दिसतो. यालाच "मिश्रक' असेही नाव आहे.
६) भूमिज शैलीची मंदिरे :-
ही शैली नागर शैलीच्या मंदिरांची उपशैली आहे. या प्रकारची मंदिरे नर्मदा नदीच्या बाजूच्या परिसरात, माळव्यात व महाराष्ट्रात आढळतात. यातही प्रस्तर शिखर असलेली आणि विटांची शिखर असलेली भूमिज मंदिरे असे दोन प्रकार आढळतात. अंबरनाथचे शिवमंदिर, गोंदेश्वरचे मंदिर ही भूमिज प्रकारची मंदिरे आहेत.
माहिती संदर्भ :- आंतरजाल
-------------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
-------------------------------------------------

No comments:
Post a Comment