-------------------------------------------
सदर शिल्प टोका गावातल्या सिद्धेश्वर मंदिरातील भिमाच्या गर्व हरणाची कथा सांगणारे आहे.
---------------------------------------------
"भिमाचे गर्व हरण"
सदर शिल्प टोका गावातल्या सिद्धेश्वर मंदिरातील भिमाच्या गर्व हरणाची कथा सांगणारे आहे.
कथा थोडक्यात अशी की पाच पांडवा पैकी भिमाला आपल्या अंगांत असलेल्या १०० हत्तीच्या बळाचा गर्व होतो . हे श्री कृष्णांच्या लक्षात येते , व भगवान श्रीकृष्ण हनुमंताच्या मदातीने एक लिला दाखवतात.
एकदा वाटेने जात असतांना एक वृद्ध वानराच्या रूपातील हनुमंताची शेपटी भिमाला आडवी येते. रागाने भिम त्या वृद्ध वानराला शेपटी बाजूला घ्यायला सांगतो , परंतू वय झाल्याने ते त्याला शक्य नाही, असे तो वृध्द वानर सांगतो. तेव्हा शक्तीचा गर्व असलेला भिम स्वतः शेपाटी बाजूला सारण्यासाठी पुढे सरसावतो. परंतू सर्व बळ पणाला लावून सुध्दा भिमाला शेपटी हलवता येत नाही . तेव्हा हा वानर कोणतातरी अलौकिक आहे हे भिमाच्या लक्षात येते व भिम त्या वानराला शरण जातो. शरण आलेल्या भिमाला हनुमंत मूळ रूपात प्रगट होउन दर्शन देतात .
सदर शिल्पा मध्ये झाडाखाली वानर रूपातील हनुमंत आहे तर शेपटी उचलण्याचा प्रयत्न करतांना महाकाय भिम आहे.
माहिती संदर्भ :-maharashtra_desha
----------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
-----------------------------------------------

No comments:
Post a Comment