------------------
अष्टलक्ष्मी
-------------------
धनलक्ष्मी
धनधान्य आणि संपत्ती देणारी लक्ष्मी आहे. या लक्ष्मीला वैभवलक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते. या लक्ष्मीची आगमनाची वेळ सायंकाळची आहे.
आदीलक्ष्मी
लक्ष्मीचे हे मूळ स्वरूप आहे. भगवान विष्णूची सेवा करणारी हीच ती लक्ष्मी. आदी या शब्दाचा याठिकाणी अर्थ म्हणजे कधीही न संपणारी.
धान्य लक्ष्मी
या लक्ष्मीच्या नावातच तिचे कार्यक्षेत्र आलेले आहे. धान्यलक्ष्मीला 8 हात असून तिच्या हातात गदा आणि कमळाची दोन फुले असतात. एका हाताने ही देवी अभयमुद्रा दर्शविते तर दुसऱ्या हाताने भक्तांना आशीर्वाद देते.
धैर्यलक्ष्मी
माणसाचे पेशन्स म्हणजेच वाढविण्याचे काम लक्ष्मीचे हे रूप करते. कधीकधी आपल्याजवळ पैशांची किंवा धनधान्याची कमतरता असते अशा वेळी माणसाचे पेशन्स संपतात त्यावेळी याच लक्ष्मीच्या कृपेची गरज असते.
गजलक्ष्मी
भगवान इंद्राचे गेलेले वैभव परत आणणाऱ्या या लक्ष्मीला वाहन लक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते. या लक्ष्मीला चार हात असून तिच्या आसपास गज म्हणजेच हत्ती कमळाच्या पुष्पांची वृष्टी करत असतात.
संतान लक्ष्मी
आपल्याला चांगली संतती असावी असे प्रत्येकाला वाटते. इच्छा पूर्ण करणारी लक्ष्मी म्हणजे संतान लक्ष्मी. या लक्ष्मीला सहा आहेत. तिच्याजवळ पाण्याचा कलश असून त्यात आंब्याची पाने असतात. जवळ एक श्रीफळ म्हणजे नारळ असते. तिच्याजवळ असलेल्या एका लहान बालकाच्या हातात कमळाचे फूल असते.
विजयलक्ष्मी
आपण कोणतेही कार्य केले तरी त्यात यश मिळाले नाही तर फायदा काय होणार. हातात घेतलेल्या कोणत्याही कामात विजय मिळावा असे प्रत्येकाला वाटत असते. हा विजय देण्याचे कार्य विजयालक्ष्मी करते. विजय लक्ष्मीला सहा हात असून तिच्या हाती चक्र व शंख असतो. हातामध्ये तलवार, पाश आणि ढाल असते.
विद्यालक्ष्मी
देवी सरस्वती प्रमाणे विद्या देण्याचे कार्य विद्यालक्ष्मी करते. या लक्ष्मीच्या नियमित पूजनाने अठरा विद्या प्राप्त होतात.
अष्टलक्ष्मीची मंदिरे
- अष्टलक्ष्मी मंदिर दिलसुखनगर हैदराबाद आंध्र प्रदेश.
- अष्टलक्ष्मी मंदिर ह्यूस्टन, टेक्सास अमेरिका.
- अष्टलक्ष्मी मंदिर नोर्थ हॉलिवूड कॅलिफोर्निया अमेरिका.
- अष्टलक्ष्मी मंदिर चेन्नई
- अष्टलक्ष्मी मंदिर तेलंगणा
माहिती संदर्भ :- फेसबूक वरून
----------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
-----------------------------------------------

No comments:
Post a Comment