Sunday, 14 June 2020

!मंदिरात बसून करायची प्रार्थना!


अनायासेन मरणम्
विना दैन्येन जीवनम्
देहान्ते तव सान्निध्यम्
देहि मे परमेश्वरम्

आपण जेंव्हा मंदिरात दर्शनाला जातो तेंव्हा भगवंताचे दर्शन घेतल्यावर थोडा वेळ आपण मंदिरात बसतो. आपल्या जेष्ठ वडीलधाऱ्यांनीच अशी शिकवण आपल्याला दिलेली आहे. दर्शनानंतर मंदिरात बसायचं ते कां ???
तर, तिथे बसून वर नमूद केलेली प्रार्थना, ईश्वरास करायची असते. त्या प्रार्थनेचा अर्थ असा कि. .

आपण दर्शन घेऊन आलेल्या भगवंताचं रुप नजरेसमोर स्मरून प्रार्थना करावी. . .
अनायासेन मरणम् म्हणजेच हे ईश्वरा मला सहज मृत्यु येऊ दे. मृत्यु समयी मला कुठलेही लोभ, मोह, दुःख जडणार नाही असं तू वरदान दे.
विना दैन्येन जीवनम्
 म्हणजेच हे ईश्वरा मला दैन्यावस्थेचं जीवन नको. मी परावलंबी होऊन पडून असेन असं होऊ देऊ नकोस. माझं मी करायला आजीवन मला समर्थ ठेव. मला परवशता नको, सामर्थ्य हवे. तसे मला वरदान दे.
देहान्ते तव सान्निध्यम्
म्हणजे देवा माझा मृत्यु समीप येईल तेंव्हा मला तुझंच स्मरण असो. माझ्या जिव्हेवर तुझंच नाम असो. तुझं सान्निध्य असताना मला मृत्यु आल्यास तेच माझं अहोभाग्य.
देहि मे परमेश्वरम्
हे ईश्वरा तुझी कृपा असो आणि मी मागितलेले वरदान तू मला प्रसन्न होऊन द्यावे अशी मी प्रार्थना करतो.
अर्चना म्हणजे विनंती आणि प्रार्थना म्हणजे पराकाष्ठेची विनंती. पराकाष्ठेची विनंती ईश्वर ही मान्य करतोच.
----------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
------------------------------------–----------

No comments:

Post a Comment