----------------
गायत्री जयंती - गायत्री देवी
-----------------
शब्द-कल्पद्रुमानुसार एकदा ब्रह्मापत्नी सावित्रीस यज्ञस्थळी प्रवेश नाकारण्यात आला. क्रुद्ध ब्रह्मदेवाने दुसऱ्या स्त्रीसोबत विवाह करून यज्ञ समाप्त करण्याची इच्छा धरिली. त्याच्या इच्छेनुसार वधू शोधन करताना इंद्रास एका गवळ्याची पोर मिळाली. विष्णूच्या सल्ल्यानुसार या मुलीशी ब्रह्मदेवाने गांधर्वविवाह केला. ही मुलगीच गायत्री होय.
गायत्रीच्या ध्यानानुसार ती सूर्यमंडलात मध्यस्थानी असून ब्रह्म, विष्णू वा शिवरूपिणी आहे. यज्ञोपवीतधारी ब्राह्मणांनी त्रिकाळ गायत्रीचा मंत्रजप करणे अपेक्षित असते. गायत्रीची स्तुती छांदोग्य उपनिषद व बृहदारण्यक उपनिषद या वैदिक ग्रंथांत केली आहे.
गायत्री मंत्राच्या आधाराने इतरही काही देवतांच्या गायत्री रचण्यात आल्या आहेत.
गायत्री मंत्र ही ऋग्वेदातील एक ऋचा (ऋग्वेद ३.६२.१०) आहे. ही ऋचा मंत्राप्रामाणे उच्चारली जाते. ही ऋचा गायत्री छंदात आहे. हा मंत्र सूर्याच्या उपासनेचा मंत्र आहे.
गायत्री मंत्र येणेप्रमाणे :
“ॐ भूर्भूवः स्वः। तत्सवितुर्वरेण्यं।
भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात्।”
मंत्राचा अर्थ :
विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते; त्याचे आम्ही ध्यान करतो. तोच सच्चिदानंदरूप आहे. तो अज्ञानाचा नाश करतो.
तो आमच्या बुद्धीला प्रेरणा देतो. त्याच्या तेजाचे आम्ही ध्यान करतो. आमची सत्कर्मे -सद्विचार-सदाचार-संभाषणे सद्वर्तनाकडे प्रवृत्त होवोत.
गायत्री मंत्रात परब्रह्माचे म्हणजे सात्याचे स्मरण करताना आपल्या डोळ्याना दिसणारा सूर्यच समोर आणायचा असतो. तो सविता आमच्या सर्वांच्या बुद्धीला प्रेरणा देवो अशी प्रार्थना यामध्ये करायची असते.
------------------------------------------------
गायत्री मंत्राच्या २४ अक्षरांमध्ये चमत्कारी शक्ती
-----------------------------------------------
गायत्री महामंत्र आणि अर्थ
गायत्री मंत्र :
ऊँ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्।
अर्थ -
त्या प्राणस्वरूप, दु:ख नाशक, सुख स्वरूप, श्रेष्ठ, तेजस्वी, पापनाशक, देव स्वरूप परमेश्वराला आम्ही अंतरआत्म्यात धारण करू. त्या परमेश्वराने आमच्या बुद्धीला चांगल्या मार्गासाठी प्रेरित करावे.
गायत्री मंत्रात चोवीस (२४) अक्षर आहेत.
ऋषिमुनींनी या अक्षरांमध्ये बीजरुपात विद्यमान त्या शक्ती ओळखल्या ज्यांना चोवीस अवतार, चोवीस ऋषी, चोवीस शक्ती आणि चोवीस सिद्धी मानले गेले आहेत. गायत्री मंत्राच्या चोवीस अक्षरांमध्ये चोवीस देवता आहेत. याने काय लाभ मिळू शकतो त्याचे वर्णन असे आहेत:
1. तत्: देवता - गणपती, यश शक्ती
फल : अवघड कामात यश, विघ्नांचा नाश, बुद्धीत वृद्धीत
2. स: देवता- नरसिंह, पराक्रम शक्ती
फल : पुरुषार्थ, पराक्रम, शूर, शत्रूनाश, दहशत-आक्रमणाने रक्षा
3. वि: देवता-विष्णू, पालन शक्ती
फल : प्राण्यांचे पालन, अवलंबून असलेल्यांचे संरक्षण, पात्रतेत वृद्धी
4. तु: देवता- शिव, कल्याण शक्ती
फल : अनिष्टाचा विनाश, कल्याण वृद्धी, निश्चितता, आत्म-दया
5. व: देवता- श्रीकृष्ण, योग शक्ती
फल : क्रियाशीलता, कर्मयोग, सौंदर्य, सरसता, अनासक्ती, आत्मनिष्ठा
6. रे: देवता- राधा, प्रेम शक्ती
फल : प्रेम-दृष्टी, शत्रुत्वाची समाप्ती
7. णि: देवता- लक्ष्मी, धन शक्ती
फल : धन, पद, यश आणि भोग्य पदार्थांची प्राप्ती
8. यं: देवता- अग्नी, तेज शक्ती
फल : प्रकाश, शक्ती आणि सामर्थ्यात वृद्धी, प्रतिभावान आणि तेजस्वी होणे
9. भ : देवता- इंद्र, रक्षा शक्ती
फल : रोग, हिंसक चोर, शत्रू, भूत-प्रेतांच्या आक्रमणापासून रक्षा
10. र्गो : देवता- सरस्वती, बुद्धी शक्ती
फल: मेधाचा विकास, बुद्धिमत्ता मध्ये पवित्रता, दूरदृष्टी, चतुराई, विवेक
11. दे : देवता- दुर्गा, दमन शक्ती
फल : विघ्नांवर विजय, दुष्टांचे दडपण, शत्रूंचा नाश
12. व : देवता- हनुमान, निष्ठा शक्ती
फल : कर्तव्यपरायणता, निष्ठावान, विश्वासी, निर्भयता आणि ब्रह्मचर्य-निष्ठा
13. स्य : देवता- पृथिवी, धारण शक्ती
फल : गंभीरता, क्षमाशीलता, भार सहन करण्याची क्षमता, सहिष्णुता, दृढता, सहनशीलता
14. धी : देवता- सूर्य, प्राण शक्ती
फल : आरोग्य-वृद्धी, दीर्घ जीवन, विकास, वृद्धी, उष्णता, कल्पनांचे परिष्करण
15. म : देवता- श्रीराम, मर्यादा शक्ती
फल : तितिक्षा, कष्टात विचलित न होणे, मर्यादापालन, मैत्री, सौम्यता, संयम
16. हि : देवता- श्रीसीता, तप शक्ती
फल: निर्विकारता, पवित्रता, शील, गोडवा, नम्रता, सात्त्विकता
17. धि : देवता- चंद्र, शांती शक्ती
फल : उद्विग्नतेचा नाश, काम, क्रोध, लोभ, मोह, चिंता निवारण, आशेचा संचार
18 . यो : देवता- यम, काल शक्ती
फल : मृत्यू निर्भयता, वेळाचा सदुपयोग, स्फुरती, जागरूकता
19. यो : देवता- ब्रह्मा, उत्पादक शक्ती
फल: संतानवृद्धी, उत्पादन शक्तीत वृद्धी
20. न: देवता- वरुण, रस शक्ती
फल : भावनिकपणा, साधेपणा, कला प्रेम, दुसर्यांसाठी दयाभाव, सौम्यता, प्रसन्नता, आर्द्रता, माधुर्य, सौंदर्य
21. प्र :देवता- नारायण, आदर्श शक्ती
फल : महत्त्वाकांक्षा-वृद्धी, दिव्य गुण-स्वभाव, उज्ज्वल चरित्र, पथ-प्रदर्शक कार्यशैली
22. चो : देवता- हयग्रीव, साहस शक्ती
फल : उत्साह, शूर, निर्भयता, शूरता, आपत्तींना तोंड देण्यासाठी सामर्थ्य, पुरुषार्थ
23. द : देवता- हंस, विवेक शक्ती
फल : उज्ज्वल कीर्ति, आत्म-संतोष, दूरदर्शिता, सत्संगती, सत्य-असत्याचे निर्णय घेण्याची क्षमता, उत्तम आहार-विहार
24. यात् : देवता-तुलसी, सेवा शक्ती
फल : लोकसेवेत रुची, सत्यनिष्ठा, पातिव्रत्यनिष्ठा, आत्म-शांती, परदु:ख-निवारण
----------------------------------------------
गायत्री मंत्राचा जप करताना या गोष्टींकडे लक्ष द्यावे
-----------------------------------------------
1. गायत्री मंत्राचा जप एखाद्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली करावा.
2. गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी सकाळची वेळ श्रेष्ठ आहे, परंतु हा जप संध्याकाळीसुद्धा करू शकता.
3. मंत्र जपासाठी आसनावर बसावे आणि तुळस किंवा चंदनाच्या माळेचा वापर करावा.
4. ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सकाळ होण्यापूर्वी 2 तास अगोदर पूर्व दिशेला मुख करून जप करावे. संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर एक तासाच्या आत पश्चिम दिशेला मुख करून जप करावा.
5. या मंत्राचा मानसिक जप कोणत्याही वेळी करू शकता.
6. गायत्री मंत्राचा जप करणाऱ्या व्यक्तीचा आहार सात्विक असावा.
गायत्री मंत्राने होऊ शकतात हे फायदे
1. गायत्री मंत्र सर्व प्रकारचे सुख देणारा मंत्र आहे. या मंत्राचा विधिव्रत जप केल्यास धन, अपत्य, कौटुंबिक आणि इतर सर्व प्रकारच्या समस्या दूर होऊ शकतात.
2. जो व्यक्ती गायत्री मंत्राचा जप करतो, त्याच्यावर कोणत्याही नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडत नाही.
3. विद्यार्थ्यांनी या मंत्राचा जप केल्यास त्यांचा बौद्धिक स्टार लवकर वाढू शकतो.
4. नोकरी आणि बिझनेसमध्ये अडचणी येत असल्यास शुक्रवारी पिवळे वस्त्र धारण करून गायत्री मंत्राचा जप केल्यास अडचणी दूर होऊ शकतात."
------------------------------------------------
गायत्री मंत्राचे आरोग्यदायी फायदे –
------------------------------------------------
१)मनःशांती मिळते –
गायत्री मंत्राची सुरूवात ‘ॐ’ पासून होते. ॐ चा उच्चार करताना, ओठ ,जीभ ,घशातील मागील बाजू व मेंदूतून विशिष्ट लहरीं उत्त्पन्न होतात. यामुळे शरीरात शांतता प्रस्थापित करणार्या हार्मोन्सची निर्मीती होते. अस्वथता कमी होऊन शांतता निर्माण झाल्याने एकाग्रता वाढण्यास मदत होते.
२)रोगप्रतिकारशक्ती वाढते –
गायत्री मंत्राच्या उच्चाराने ओठ ,जीभ ,घशातील मागील बाजू व मेंदूतील एकाग्रता वाढवणारा भाग यावर ताण येऊनतेथे अनुनाद निर्माण होतो. या लहरींमुळे शरिरातील विविध कार्य संतुलित करणारी ‘हायपोथॅलमस’ ही ग्रंथी उत्तेजित होते. व रोगप्रतिकारशक्तीचे सबलीकरण करण्यास मदत होते. तज्ञांच्या मते, गायत्री मंत्राच्या उच्चारामुळे, आनंद देणार्या हार्मोन्सची उत्त्पती होते.त्यामुळे एकाग्रता वाढते. तुम्ही जितके आनंदी रहाल तितकी तुमची रोगप्रतिकारशक्ती अधिक वाढेल.
आकलन व स्मरणशक्ती वाढते.- इंटरनॅशनल जनरल ऑफ़ योगाने प्रसिद्ध केलेल्या निष्कर्षानुसार, गायत्री मंत्राचे उच्चारण केलेल्या व्यक्तीची स्मरणशक्ती व एकाग्रता इतरांपेक्षा अधिक आहे. कारण या मंत्राच्या उच्चाराने शरीरात असणारी चक्र कार्यान्वित होतात. व त्यामुळे शारिरीक स्वास्थ्य राखण्यास मदत होते.
३) श्वसनाची क्रिया सुधारते-
गायत्री मंत्राच्या उच्चारासाठी दिर्घ व नियंत्रित श्वसनाची गरज असते. यामुळे फुफ्फुसांचे कार्य सुधारते.परिणामी श्वसनही सुधारते. दिर्घ श्वास घेतल्याने शरिरात सतत ऑक्सिजनचा पुरवठा होतो व स्वास्थ्य सुधारते.
हृदयाचे कार्य सुधारते – ब्रिटिश मेडिकल जर्नल मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार , गायत्री मंत्राच्या उच्चारामुळे , मानवी श्वसनाची क्रिया संतुलित होते त्यामुळे ह्र्दयचे ठोके नियमित होण्यास व ह्र्द्याचे कार्य सुधारण्यास मदत होते. या अभ्यासानुसार हृदयाचे सुरळित कार्य व श्वसन क्रिया यांमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो व हृदयाचे विकार दुर ठेवण्यास मदत होते.
४)मज्जातंतूंचे कार्य सुधारते –
गायत्री मंत्र उच्चारताना, ओठ ,जीभ ,घशातील मागील बाजू व मेंदूतील एकाग्रता वाढवणारा भाग,स्वरयंत्र यावर ताण येतो व तयार होणारा अनुनाद मज्जातंतूंचे कार्य सुरळित करून त्यांना चालना देतो.तसेच यामुळे न्युरोट्रान्समीटरचा प्रवाह देखील सुरळित होतो.
५)ताण-तणाव कमी होतो –
गायत्री मंत्रामुळे ताण-तणावामुळे होणारा त्रास कमी होतो. ताणतणावाचा शरीरावर घातक परिणाम होत असतात त्यापासून रक्षण करण्याबरोबरच रोगप्रतिकारशक्ती वाढवून तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच रोज गायत्री मंत्राचे उच्चार केल्यास ताण दुर होतो. व शारीरिक स्वास्थ्य सुधारते.
मानसिक स्वास्थ्य सुधारते व
६)नैराश्य दुर होते –
गायत्री मंत्र मेंदुचे कार्य सुधारतो,तुम्हाला अधिक शांत व ध्येयवादी करतो.तसेच गायत्री मंत्रामुळे , ताण कमी होऊन माणूस अधिक लवचिक होतो.इंटरनॅशनल जनरल ऑफ़ योगाच्या अहवालानुसार वेगस नर्व्हचे कार्य सुधारण्यास मदत होते.तसेच एंडॉरफिन या हार्मोन्सची निर्मिती वाढते. यामुळे नैराश्य दुर ठेवण्यास मदत होते.
७)त्वचेला कांती देते –
गायत्री मंत्राच्या उच्चारामुळे चेहर्यावरील काही विशिष्
८)बिंदूंना उत्तेजना मिळते .
त्यामुळे रक्तप्रवाह सुरळित होतो व विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. याचबरोबरीने दिर्घ श्वसन केल्याने त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळतो व कांती मिळण्यास मदत होते.
९)अस्थमाच्या लक्षणांपासून दुर ठेवते –
गायत्री मंत्राचा उच्चार करताना, दीर्घ श्वास घेऊन तो काही काळासाठी रोखून ठेवणे आवश्यक आहे. यामुळे फुफ्फुसांचे कार्य सुधारते व तुम्ही अस्थमापासून दुर राहता.
-------------------------------------
गायत्री मंत्राची फलप्राप्ती
-------------------------------------
गायत्री मंत्राच्या फलप्राप्तीसाठी सूर्यध्यान करून योग्य पद्धतीने साधना करावी लागते
दररोज दहा वेळा किंवा बारा वेळा किंवा एकशेआठ वेळा गायत्री मंत्राचा जप मनोभावे करावा, असे ग्रंथात सांगितले आहे.
गायत्री मंत्राच्या सव्वा लाख जपाला अनुष्ठान म्हणतात. हे अनुष्ठान केव्हाही करावे;
पण पंचमी, एकादशी व पौर्णिमा या शुभतिथी मानल्या गेल्या आहेत.
अनुष्ठानासाठी वद्यपक्षापेक्षा शुक्लपक्ष अधिक श्रेयस्कर मानला जातो. मात्र गायत्री मंत्राचा जप यथार्थ रीतीने व्हायला हवा.
मंत्राच्या उच्चारणाला खूप महत्त्व असे. मंत्रातील प्रत्येक अक्षराचा उच्चार कसा करायचा याचे शास्त्र आहे. ध्वनी किती बरोबर उमटतो, याला महत्त्व आहे. तो विशिष्ट लयीत आणि विशिष्ट सुरात उच्चारायला हवा. तरच त्यातून विलक्षण नादमाधुर्य स्र्वू लागेल.
मंत्रातील सर्व शब्दांचा उच्चार स्पष्ट आणि शुद्ध हवा आणि त्याचा अर्थही नीट समजून घ्यायला हवा.
म्हणूनच कोणताही मंत्री योग्य जाणकार गुरूकडून शिकून घेतला पाहिजे.
गायत्री मंत्राची उपासना करणा-या साधकाची सदसद्विवेकबुद्धी जागृत हवी.
त्याने असत्याने कुटिल वागून चालणार नाही. गायत्री मंत्राची उपासना करणा-या व्यक्तीची एकंदर प्रवृत्ती वाईट असली तर उपासना निष्फळ ठरते.
शिवाय योग्य गुरू वाचून गायत्री मंत्राची साधना करणे म्हणजे वादळात शिड फाटलेल्या नौकेतून पैलतीरी जाण्याचा आत्मघातकी प्रयत्न करण्यासारखे आहे.
गायत्री मंत्राच्या साधनेने उत्तम गुणसंपदा प्राप्त होते. साधकाची जीभ पातळ होते, त्यामुळे साधकाचे शब्दोच्चार स्पष्ट आणि बिनचूक होतात. मानसिक व शारीरिक बल वाढते. बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती विकसित होते. उत्तम आरोग्य लाभून प्रापंचिक आणि पारमार्थिक समृद्धी प्राप्त होते.
गायत्री मंत्राच्या उच्चतम साधनेने साधकाची कुंडलिनी शक्ती जागृत होऊ शकते. त्याच्यातील अनेक सिद्धींची जाणीव त्याला होऊन त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळू लागतो. मानसिक प्रसन्नता आणि शांती कैक पटीने अधिक अनुभवास येते.
सर्व ऋषिमुनींनी, साधुसंतांनी गायत्रीला गौरविलेले आहेच; तसेच आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ जाणकारांनी आणि विचारवंतांनीही गायत्री मंत्राचा गौरव केला आहे.
स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणतात, ‘‘गायत्रीच्या जपाने फार मोठी शक्ती प्राप्त होते. तिची प्रत्यक्ष साधना करूनच तिचा अनुभव घ्यायला हवा.
’’ स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘गायत्री हा सद्बुद्धी देणारा मंत्र आहे. सद्बुद्धीने सन्मार्गाचा लाभ होतो आणि सन्मार्गाने जात असताना सत्कर्मेही आपोआप घडतात.’’
लोकमान्य टिळक म्हणतात, ‘श्रेष्ठ मार्गाने जाण्याची प्रेरणा देण्याचे प्रचंड सामर्थ्य गायत्री मंत्रात आहे.
गायत्रीच्या साधनेमुळेच सदसद्विवेकबुद्धी प्राप्त होते.’ पंडित मदनमोहन मालवीय म्हणतात, ‘‘ईश्वराविषयी अनन्यनिष्ठा गायत्रीमुळेच निर्माण होते. एवढेच नव्हे, तर भौतिक ऐश्वर्यही गायत्रीमुळे प्राप्त होते.’’
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन गायत्रीचा महिमा सांगताना म्हणतात, ‘‘गायत्री मानवतेला मिळालेली महान देणगी अहे. यथार्थ ज्ञानाचा स्रेत मानवी अंतर्मनात गायत्रीने प्रवाहित होऊ शकेल. इतकेच नव्हे, तर शाश्वत ज्ञानाचे अक्षय्य तेवणारे असंख्य नंदादीप मानवच मानवतेच्या मंदिरात लावू शकेल.’’
-------------------------------------------------
गायत्री देवीसंबंधी पौराणिक कथा
-------------------------------------------------
देवी गायत्रीची तीन रूपे मानली जातात.
◆सकाळी ती रक्तवर्णी अक्षमाला-कमंडलुधारिणी ब्राह्मी असते.
◆मध्याह्नी ती शङ्ख, चक्र, गदा धारणकारिणी वैष्णवी असते व
◆ संध्याकाळी ती वृषभारूढा व शूळ, पाश, नर-कपाल धारिणी वृद्ध शिवानी असते.
शब्द-कल्पद्रुमानुसार
एकदा ब्रह्मापत्नी सावित्रीस यज्ञस्थळी प्रवेश नाकारण्यात आला. क्रुद्ध ब्रह्मदेवाने दुसऱ्या स्त्रीसोबत विवाह करून यज्ञ समाप्त करण्याची इच्छा धरिली. त्याच्या इच्छेनुसार वधू शोधन करताना इंद्रास एका गवळ्याची पोर मिळाली. विष्णूच्या सल्ल्यानुसार या मुलीशी ब्रह्मदेवाने गांधर्वविवाह केला. ही मुलगीच गायत्री होय.
गायत्रीच्या ध्यानानुसार ती सूर्यमंडलात मध्यस्थानी असून ब्रह्म, विष्णू वा शिवरूपिणी आहे. यज्ञोपवीतधारी ब्राह्मणांनी त्रिकाळ गायत्रीचा मंत्रजप करणे अपेक्षित असते.
गायत्रीची स्तुती छांदोग्य उपनिषद व बृहदारण्यक उपनिषद या वैदिक ग्रंथांत केली आहे. गायत्री मंत्राच्या आधाराने इतरही काही देवतांच्या गायत्री रचण्यात आल्या आहेत.
--------------------------
गायत्रीदेवीचे वर्णन
--------------------------
वैदिक संध्याविधीतील गायत्री ध्यानाच्या श्लोकात गायत्रीचे वर्णन दिसून येते.
मुक्ताविद्रुमहेमनीलधवलच्छायैर्मुखेस्त्रीक्षणैर्युक्तामिन्दुकलानिबद्धमुकुटां तत्त्वार्थवर्णात्मिकाम्| गायत्रीं वरदाभयाङ्कुशकशाशूलं कपालं गुणं शङ्ख चक्रमथारविन्दयुगुलं हस्तैर्वहन्तीं भजे||
गायत्री देवीला प्रत्येक मुखाला तीन डोळे असतात. चंद्रकलेने युक्त असा प्रत्येक मुकुट असतो. मोती, पोवळी, सोने, इंद्रनील व धवल अशा वर्णांची पाच मुखे असतात. तिला दहा हात असून त्या हातात वरदचिन्ह, अभयचिन्ह, अंकुश, चाबूक, शूल, कपाल, रज्जू, शंख, चक्र व कमळांची जोडी असते. ती ब्रह्मप्रतिपादक आहे.
◆ बाल्यावस्थेतील गायत्रीदेवी
बालां बालादित्यमण्डलमध्यस्थां रक्तवर्णां रक्ताम्बरानुलेपनस्रगाभरणां चतुर्वक्त्रां दण्डकमण्डल्वक्षसुत्राभयाङ्कचतुर्भुजां हंसासनरूढां ब्रह्मदैवत्यामृग्वेदमुदाहरन्तीं भूर्लोकाधिष्ठात्रीं गायत्रीं नाम देवतां ध्यायामि |
प्रातःकाळी गायत्री बाल्यावस्थेत असून ती उदयकालीन सूर्यमंडळाच्या मध्यवर्ती असते. तिचा वर्ण व वस्त्रे रक्तवर्णाची(लाल)असतात. तिला चार मुखे असतात. चार हात असून त्या हातात दंड,कमंडलू,वक्षसूत्र व अभयचिन्ह असते. ती ब्रह्मस्वरूपी असून हंसावर बसलेली असते. ती ऋग्वेदाचे पठण करत असून भू-लोकाची नियंत्रक असते.
◆युवावस्थेतील गायत्रीदेवी
युवतीं युवादित्यमण्डलमध्यस्थां श्वेतवर्णां श्वेताम्बरानुलेपनस्रगाभरणां चतुर्वक्त्रां प्रतिवक्त्रं त्रिनेत्रां चन्द्रशेखरां त्रिशूलखड्गखट्वाङ्गडमर्वंकर्भुजां वृषभासनरूढां रुद्रदैवत्याम् यजुर्वेदमुदाहरन्तीं भूवर्लोकाधिष्ठात्रीं गायत्रीं नाम देवतां ध्यायामि |
मध्यान्हकाळी गायत्री युवावस्थेत असून ती मध्यान्हकालीन सूर्यमंडळाच्या मध्यवर्ती असते. तिचा वर्ण व वस्त्रे श्वेतवर्णाची(पांढरा)असतात. तिला चार मुखे असतात.प्रत्येक मुखाला तीन डोळे असून तिच्या मस्तकावर चंद्र असतो. चार हात असून त्या हातात त्रिशूळ, खड्ग, खट्वांग व डवरू असते. ती रुद्रस्वरूपी असून बैलावर बसलेली असते. ती यजुर्वेदाचे पठण करत असून भुव-लोकाची नियंत्रक असते.
◆ वृद्धावस्थेतील गायत्रीदेवी
वृद्धां वृद्धादित्यमण्डलमध्यस्थां श्यामवर्णां श्यामम्बरानुलेपनस्रगाभरणामेकवक्त्रां शङ्खचक्रगदापद्माङ्क गरुडासनरूढां विष्णुदैवत्यां सामवेदमुदाहरन्तीं स्वर्लोकाधिष्ठात्रीं सरस्वतीं नाम देवतां ध्यायामि |
सायंकाळी गायत्री वृद्धावस्थेत असून ती अस्तकालीन सूर्यमंडळाच्या मध्यवर्ती असते. तिचा वर्ण व वस्त्रे श्यामवर्णाची(सावळा)असतात. तिला एकच मुख असते. चार हात असून त्या हातात शंख, चक्र, गदा व पद्म असते. ती विष्णूस्वरूपी सरस्वती असून गरुडावर बसलेली असते. ती सामवेदाचे पठण करत असून स्वर्ग-लोकाची नियंत्रक असते.
◆ गायत्री मंत्र येणेप्रमाणे :
“ ॐ भूर्भूवः स्वः। तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात्।
मुंजीत बटूला गायत्रीमंत्र शिकविण्यात येतो. हा जप केल्याने भूतबाधा होत नाही. तसेच सदाचरण, सत्कर्म करण्यासाठी मनुष्य नि:शंक आणि निर्भय होतो.
गायत्री हे देवीचे नाव आहे. ते ऋग्वेदातील एका छंदाचेही नाव आहे. सूर्य-गायत्री विशेष प्रसिद्ध आहे. राम अगस्त्य मुनींच्या आश्रमात जातो. त्याला अठरा देवतांची देवळे दिसतात. त्यापैकी एक देऊळ गायत्रीचे होते. ब्रह्मदेवाच्या दुसर्या बायकोचे नाव गायत्री आहे.
ती पूर्व दिशेची अधिष्ठात्री आहे. ओंकारातील उदात्त मात्रा म्हणजे गायत्री. ती हंसवाहिनी आहे. गायत्री देवी कुमारी असून लाल वस्त्र नेसते. लाल दागदागिने घालते. अंगाला लाल उटणे लावतात. उपनिषदामध्ये गायत्री मंत्राच्या प्रत्येक अक्षराचे सविस्तर विवेचन केले आहे." - ओंकारातील उदात्त मात्रा म्हणजे गायत्री
-----------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
------------------------------------------------
No comments:
Post a Comment