Thursday, 18 June 2020

ज्वालाजी मंदिर


--------------------------
ज्वालाजी मंदिर
------------------------

हे मंदिर हिमाचल प्रदेश मधील कांग्रा जिल्ह्यातील ज्वालामुखी गावात आहे.ह्या मंदिरात कधीच न विझणारी ज्योत आहे जिला भक्त ज्वालाजी म्हणून मानतात आणि पूजा करतात.

ह्या मागे एक रंजक कहाणी आहे.

भगवान शंकर आणि सती ह्यांचा विवाह सतीचे वडील प्रजापती दक्ष ह्यांना मान्य नव्हता. एकदा जेव्हा दक्षाने मोठा यज्ञ करायचे ठरवले तेव्हा सर्वाना आमंत्रण दिले परंतु सती व शिवाला आमंत्रण दिले नाही. तरीही सती त्या स्थळी गेली पण दक्षाने शिवाचा अपमान केला.

हे सहन न झाल्याने सतीने क्रोधाने यज्ञकुंडात उडी घेतली. हे पाहून व्यथित आणि क्रोधीत होऊन भगवान शंकरांनी सतीचा देह घेऊन तांडव सुरु केले.विश्वाचा विनाश होणार ह्या भीतीने भगवान विष्णू ह्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे ५१ तुकडे केले. ते देहाचे भाग पृथ्वीवर जिथे पडले तिथे शक्तिपीठे आहेत अशी धारणा आहे.
तर ह्या ठिकाणी सतीची जिव्हा म्हणजेच जीभ पडली व तिथेच ज्वालाजी मंदिर बांधले अशी आख्यायिका आहे.

मुघल शासक अकबराने त्याच्या राज्यात ही ज्योत विझवण्याचे अनेक विफल प्रयत्न केले.आजही पुजारी न घाबरता ह्या ज्योतीमध्ये हात घालून तो दर्शनाला येण्याऱ्या भक्ताच्या डोक्याला लावतात. पण त्यांचा हात भाजत नाही.

ह्या ज्योतीच्या स्रोताबद्दल अनेक वेळा रिसर्च केले आहे परंतु कोणालाही तिचा उगम स्रोत सापडला नाही हे विशेष. आजही ज्वालाजी मंदिर हे रहस्यमय म्हणून ओळखले जाते.
-----------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
----------------------------------------------

No comments:

Post a Comment