Monday, 1 June 2020

॥श्री विजयी पांडुरंग॥


॥ श्री विजयी पांडुरंग ॥

आपण कधी शांतीब्रह्म संत श्री एकनाथांच्या पैठण गावाला भेट दिली असेल व तेथिल नाथांच्या वाड्यातिल विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे काय? नसल्यास अवश्या पैठणला जा व तेथील  पाडुरंगाचे दर्शन घ्या. या विठ्ठल मूर्तिचे सुक्ष्म अवलोकन केले तर तुमच्या लक्षात येईल की विठ्ठलाचा डावा हात कटावर आहे तर उजवा हात मोकळा व पसरट आहे जसे काही तरी मागतो आहे. तर अशी मूर्ति का झाली? याची कथा ऐका.......

ही कथा सुमारे साडे चारशे वर्षांपूर्विची आहे. त्याकाळी कर्नाटक प्रदेशात शिरहट्टी गावात एक धनाढ्य सावकार रहात होता. तो श्रीमंत होता परंतु पोटी संतान नसल्याने खूप दु:खी कष्टी होता. अनेक व्रत वैकल्य केले परंतु काही उपयोग झाला नाही. त्याला त्याच्याजवळील अमाप संपत्तीसाठी वारस हवा होता. त्यांना एके दिवशी एक सदगृहस्थ भेटला. त्यांच्यात संवाद झाला तेंव्हा त्याला त्यानी आपले दु:ख सागितले. सदगृहस्थ म्हणाला बाबा रे हे विधीलीखीत आहे त्याला तू काही करु शकणार नाही. तेंव्हा तू ही परिस्थिती स्विकार व तुझे धन दानधर्म सत्संग इ. ठिकाणी सत्कर्मी लाव. एखाद भव्य देउळ बांध त्यामुळे कदाचीत ईश्वरी कृपा होउ शकेल. त्याला मंदीर उभारण्याची कल्पना पटली व त्याने ते काम हाती घेतल. मंदिर पुरे होण्यास तीन महीने लागणार होते. अता तो धनाढ्य पुरोहीतांकड गेला व मूर्ती कुठली बसवावी असे विचारु लागला. तेंव्हा आपल्या गावात एक निष्णात कारागीर आहे त्याला ही जबाबदारी द्यावी अस ठरल. हा कारागीर विठ्ठल भक्त असल्याने त्यानी विठ्ठलाची कर कटावर असणारी पंचधातुची अत्यंत देखणी मूर्ती बनवली. तोपर्यंत देउळ बांधून झाल आणि ह्या मूर्तीच्या प्राणप्रतीष्ठेच्या अधल्या दिवशीच्या रात्री ह्या धनाढ्य सावकाराच्या स्वप्नात ही विठ्ठल मूर्ती आली आणि दृष्टांत देउन सांगीतल की महाराष्ट्रातील पैठणमधील माझ्या प्रिय भक्ताकडे म्हणजे नाथांकडे मला जायची ईच्छा आहे तेंव्हा मला तिकडे पोहचव. सावकाराला झालेल्या दृष्टांता मुळे सावकाराने ती मूर्ती दृष्टांता नुसार पैठणला एकनाथां कडे सोपवली.

नाथांना आपल्या अराध्य देवताची अशी लोभस मूर्ती अचानक लाभल्याने परम आनंद झाला. त्यांनी या विठ्ठल मूर्तीची यथायोग्य प्राणप्रतिष्ठा करायची ठरवल. पैठण मधील ब्रह्मवृंद बोलावले. परंतु या ब्रह्मवृदांना असा प्रकार रुचला नाही व त्यांनी यावर आक्षेप घेतला. आम्ही प्राणप्रतिष्ठा करु परंतु या मूर्तिने काहीतरी चमत्कार दाखवावा असा पवित्रा ब्रह्मवृदांनी घेतला. अता परीक्षा नाथांची होती. नाथांनी एका वाटीत लोणी साखर आणल व देवाचा धावा केला. माझी तुझ्यावरील भक्ति पवित्र आहे व तू हा लोण्याचा गोळा खाउन मला या भक्ति परीक्षेत विजयी कर. तत्क्षणी चमत्कार घडला आणि या मूर्तिरुप विठ्ठलाने आपला उजवा हात कमरेवरुन हलवला व  वाटीतील लोणी हतावर घेतले व प्रेमानी भक्षण केले.  नाथांच्या भक्तीचा विजय झाला म्हणुन या पांडुरंगाचे नाव विजयी पांडुरंग असे पडले.

पांडुरंगाचा साक्षात्कार पाहुन सर्व मंडळी चकीत झाली. ब्रह्मवृदांनी नाथांच्या पायावर लोळण घेतली. पांडुरंगाची कृपा पाहुन नाथांच्या डोळ्यातुन अश्रुधारा वाहु लागल्या. आणि चमत्कार असा की पांडुरंगाने ज्या हाताने नाथांकडून लोण्याचा गोळा स्वीकारला तो हात तसाच उताणा ठेवला व आजही तो तसाच आहे. नाथांनी पांडुरंगाला विचारल देवा आपण लोणी भक्षण केले आहे तरी हात असा उताणा का ठेवला आहे ? त्यावर पांडुरंगानी सांगीतल अरे मी तुझ्यासारख्या एखाद्या भक्ताची मी वाट पहाणार आहे. तुझ्यासारखा नि:सीम भक्त जेंव्हा मला अस लोणी खाण्यासाठी अग्रह करील तर  ताबडतोब खाइल, कंबरेहुन हात काढायचा सुध्दा वेळ जायला नको, म्हणुन पांडुरंगाचा उजवा हात तसाच पसरट आहे. सर्व अलौकीक.....

तुम्ही कधी पैठणला गेलात तर शांती ब्रम्हा संत श्री जनार्दन एकनाथ महाराज वाड्यातील मंदिरात असलेल्या भगवान श्री विजयी पांडुरंगाच्या मूर्तीच दर्शन नक्की घ्या.  तुमच्यासारख्या भक्ताची वाट पांडुरंग पहात आहे.

तुका म्हणे ऐसी आर्त ज्यांचे मनी ।
त्यांची चक्रपाणी वाट पाहे ॥

No comments:

Post a Comment