--------------------------------------------------
मंदिरात घंटा लावण्याचे कारण काय?
-------------------------------------------------
हिंदू धर्मामध्ये अनेक चालीरीती, परंपरा अशा आहेत कि ज्यांना शास्त्रीय आधार आहे. आपल्या पूर्वजांनी खूप अभ्यास करूनच त्या बनविल्या आहेत. कित्येक गोष्टींमागे ठोस अशी कारणे आहेत पण त्याला धार्मिकतेची जोड देण्यात आली जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी त्या गोष्टी आचरणात आणाव्यात.
आपण लहान असल्यापासून हे बघत आलो आहोत कि आपण जेव्हा कुठल्याही मंदिरात जातो तेव्हा तिथे घंटा हि असतेच आणि भक्तमंडळी हि घंटा वाजवूनच मंदिरामध्ये प्रवेश करतात.
शास्त्रीय कारण
मंदिरातील घंटा ह्या विशिष्ट धातूंच्या मिश्रणापासून बनविल्या जातात. कोणता धातू किती प्रमाणात मिसळावा ह्याचे प्रमाण ठरलेले असते.
घंटा बनविण्यासाठी कॅडमियम, तांबे, जस्त, निकेल, शिसे, क्रोमियम आणि मॅंगनीज हे धातू वापरले जातात.
जेव्हा घंटा वाजविली जाते तेव्हा त्यातून एक विशिष्ट ध्वनी निर्माण होतो. तो ध्वनी जेव्हा माणसाच्या कानावर पडतो तेव्हा मेंदूच्या उजव्या आणि डाव्या बाजूमध्ये सुसंवाद साधला जातो, एकरूपता येते. साधारणतः माणसाच्या मेंदूच्या दोन्ही भागाची कार्ये वेगवेगळी असतात. पण घंटेचा नाद कानावर पडल्यामुळे एका वेगळ्या स्थितीत माणूस पोचतो ज्यामध्ये मनात सुरु असलेले सगळे विचार तो विसरतो आणि एक प्रकारचा शांतपणा अनुभवतो. तसेच तो ध्वनी माणसाच्या शरीरातील सात चक्रांना जागृत करतो. ज्यामुळे काही क्षणांसाठी माणसाची एकाग्रता वाढते.
शात्रशुद्ध पद्धतीने निर्माण करण्यात आलेली घंटा हि सात सेकंदापर्यंत नाद निर्माण करते आणि एखादी घंटा जर असे करत नसेल तर समजून जा कि तो योग्य पद्धतीने बनविली गेली नाही आहे.
धार्मिक कारण
असे मानले जाते कि घंटा वाजविल्यामुळे दुष्ट शक्ति ह्या दूर पळून जातात तसेच तो आवाज हा देवासाठी आणि आपल्यासाठी श्रवणीय असतो.
मंदीरात घंटा लावण्याचे धार्मिक कारण हे आहे की जेव्हां सृष्टी निर्माण झाली तेव्हा ब्रम्ह नाद झाला होता . मंदीरात घंटा लावणे हे ब्रम्ह नाद चे प्रतीक मानले जाते. घंटा चे नादा ने जो कंपन होतो त्याने वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मकता दूर होते मन शांत होतो आणि देवाला आपण येण्याची हजिरी ही लावली जाते.
----------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
-----------------------------------------------

No comments:
Post a Comment