Saturday, 13 June 2020

कर्नाटकी बेंदूर


--------------------
कर्नाटकी बेंदूर
----------------------

यांत्रिकिकरणातही आज बैलांच्या कष्टाचे महत्त्व टिकून आहे. कर्नाटकातील शेतकर्‍यांना बेंदूर सणाची उत्सुकता असते.
शेतकर्‍यांसह लहान मुलांना बेंदूर सण म्हणजे एक पर्वणीच असते. सणानिमित्त  स्वच्छता, रंगरंगोटी,  कुंभार बांधवांकडून चिखलाची बैले तयार करण्यासाठी लगबग दिसत आहे.
 कर्नाटकात आजही बेंदूर सणाचे महत्त्व टिकून आहे. बेंदूर सण विशेषत: ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध आकाराची लहान-मोठी चिखलाची बैले तयार करुन लहानशी आकर्षक घरेही लहान मुले तयार करतात.
मातीच्या बैलांच्या शिंगांना चुन्यासह विविध रंग लावण्यासाठी बालचमू एकत्र येत असतात. त्याचा आनंद लहान मुलांच्या चेहर्‍यावर दिसून येतो

पूर्वी गल्‍लीबोळातील लहान मुले एकत्र येवून एक गट तयार करुन हाताला कडूलिंबाचा पाला बांधत दोरीने कर तोडणार्‍या बैलासारखे मान हलवित रस्त्यावरुन धावत सुटतात.
पण सध्या असे चित्र पाहणे दुर्मिळ बनत चालले आहे.

बेंंदूर सणादिवशी कर तोडणी पाहण्यासाठी गर्दी होते.
शेतकरी नदी, विहिरी, नाल्यावर जावून जनावरांना आंघोळ घालत त्यांना सजवितात. बैलांना पुरण पोळीचा नैवेद्य दाखविण्यात येतो. चिखलांच्या बैलांचे घरोघरी पूजन केले जाते. सध्या वाढत्या महागाईने  बैलांचा सांभाळ करणेही त्रासाचे होत आहे.  आधुनिक काळात बहुतेक सणांचा विसर पडत आहे.

बेंदूर सणात बैलांचा खुराक

बेंदूर सणानिमित्त बैलांना शेतकरी लोणी, हळद एकत्र करून बैलांचा खांदा चोळला जातो. त्याचे पाय गरम पाण्याने धुतले जातात. शाळवाचा खिचडा खावयास दिला जातो. बेंदरादिवशी बैलाला सजविले जाते.
तेल, हळद एकत्र करुन बैलाला पाजले जाते. पूर्वीपासून शेतकर्‍यांनी ही परंपरा जपली आहे
-----------------------------------------------
संकलन ;- सतीश अलोणी @
------------------------------------------------

No comments:

Post a Comment