Saturday, 13 June 2020

भारतातील हे मंदिर ७ दिवस अगोदर देते पाऊस येण्याचे संकेत!


----------------------------------------
भारतातील हे मंदिर ७ दिवस अगोदर देते पाऊस येण्याचे संकेत!
-----------------------------------------

  कानपूरच्या जनपथमधील जगन्नाथ देवांचे मंदिर!

 हे मंदिर एका अनोख्या विशेष कारणासाठी प्रसिद्ध आहे. ह्या मंदिराचे वेगळेपण असे आहे की, हे मंदिर पाऊस येण्याची सूचना ७ दिवस आधीच देते.

जगन्नाथ देवांचे हे मंदिर कानपूर मधील जनपथच्या भीतरगाव विकासखंड मुख्यालय पासून तीन किलोमीटरवर बेंहटा गावात आहे. असे म्हटले जाते की, ह्या मंदिराचे हे वैशिष्ट्य आहे, की पाऊस येण्याच्या ७ दिवस अगोदर ह्याच्या छतावरून पावसाचे काही थेंब आपोआप पडायला सुरवात होते.

हे रहस्य जाणून घेण्यासाठी खूप वेळा प्रयत्न करण्यात आले आहेत. पण या मंदिराचे रहस्य पुरातत्व खात्यालाही उलगडता आलेले नाही.

एवढंच नाही, माहित पडले आहे की, मंदिराचा शेवटचा जीर्णोद्धार ११ व्या शतकात झाला होता. त्याच्या आधी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार कधी झाला होता हे अजूनही माहित झालेले नाही. पाऊस येण्याची माहिती आधीच समजत असल्याने येथील शेतकऱ्यांना मात्र खूप फायदा होतो.

ह्या मंदिरात भगवान जगन्नाथ,बलदेव आणि बहिण सुभद्रा यांच्या काळ्या दगडाच्या मूर्ती स्थापन आहेत. तसेच सूर्य आणि पद्मनाभम देवांच्या मूर्ती देखील आहेत.

मंदिराच्या भिंती १४ फुट रुंद आहेत. सध्या हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. या मंदिरातून तशीच रथयात्रा निघते जशी पुरी उडीसा मधील जगन्नाथ देवांच्या मंदिरातून निघते.

मान्सूनचा पाऊस येण्याच्या एक आठवड्यापूर्वी ह्या मंदिराच्या गर्भ ग्रहच्या छतातून मान्सूनी दगडातून घनत्वाकारचे थेंब पडतात, जश्या प्रकारचा पाऊस पडणार आहे अगदी तसे. जसा पाऊस सुरु होतो तसा हा दगड सुकून जातो.

मंदिराचा पुजारी दिनेश शुक्ल यांनी सांगितले की,

खूप वेळा पुरातत्व विभाग आणि आईआईटीच्या शास्त्रज्ञांनी येथे येऊन चाचण्या केल्या,परंतु ते मंदिर वास्तविक कधी निर्माण झाले आणि पावसाचा अंदाज वर्तवणाऱ्या थेंबांचे रहस्य काय हे मात्र त्यांना समजू शकले नाही.

मंदिराचा आकार बौद्ध मठाप्रमाणे आहे. त्यामुळे लोक मानतात की, हे मंदिर सम्राट अशोकाने बनवले असेल, परंतु मंदिराच्या बाहेर असलेल्या मोर आणि चक्र यांच्या आकृती वरून काही लोकांना वाटते कि ह्या मंदिराचे निर्माण सम्राट हर्षवर्धन यांच्या काळात झाले असावे.
------------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
-----------------------------------------------

No comments:

Post a Comment