"आदेश" या महाशब्दाचा अर्थ...?
नाथसंप्रदायात "आदेश" या शब्दाला नवनाथांनी फार महत्वाचे स्थान दिलेले आहे.
नाथपंथी साधु कुठल्याही मंदिरात जाताना दर्शन घेण्याअगोदर "आदेश" पुकारतात. समोरासमोर भेट होणाऱ्या साधुलाही 'अलख निरंजन' "आदेश" करतो. आदेश या शब्दातील प्रमुख अर्थ हा आहे, की आत्मा, जीवात्मा व परत्मा ह्या तिघांची एकता म्हणजे आदेश.
'आ' म्हणजे आत्मा 'दे' म्हणजे (देवो) जीवात्मा व 'श' म्हणजे शिवरूप परमात्मा.
ह्या तिन्ही शक्ती ज्यांत आहेत तो आदेश! नाथपंथात या शब्दाने एकमेकांना परब्रह्माच्या रूपाची ओळख करून दिली जाते. योगीजन सातत्यानं ह्या सृष्टीकडे पहात असतात. त्याची जाणीव ह्या शब्दानं एकमेकांना करून देतात. नाथपंथी गुरू आपल्या शिष्याला ज्यावेळी आदेश देतो, त्यावेळी त्याला तो यौगिकदृष्ट्या हेच सांगतो की सृष्टीकडे एकात्मक भावानं पहा. मी सदैव ह्याच भावांत आहे. माझं वास्तव्य म्हणजे एक 'आदेश' आहे. हा विचार फारच प्रगल्भ बुद्धीमत्तेचा आहे. ज्ञान - योगाचा आहे.
"आदेश" हा शब्दच असा आहे, की तो विशिष्ट आवाजात उच्चारताच अंगावर रोमांच उभे राहतात. परमेश्वर व भक्त क्षणांत एकरूप होऊन जातात. म्हणून आजही ह्या पवित्र शब्दाला नाथपंथात बहुमान आहे .
॥श्री गुरुदेव दत्त॥
॥ॐ नमो आदेश॥
.jpeg)
No comments:
Post a Comment