श्री दत्त प्रभू हे भोग व मोक्ष दोनीही देतात...
श्रीदत्त प्रभू भोग व मोक्षाचे दाते होत. त्यांची आराधना करण्यासाठी केवळ त्यांच्या पादुकांची आराधना केली असता पुरे. चारी वेद श्वान रूपाने त्यांच्या पादुका जवळ साऱ्या अपवित्रतेस पवित्र करीत त्यांच्या चरण कमली पडून असतात. श्री दत्तात्रेयांच्या पवित्रतेची कल्पना करण्यास मानव तर काय देवता व सप्तऋषी सुध्दा असमर्थ होत. युगांतरी जेंव्हा वामनावतार झाला तेंव्हा त्याचे समकालीन असलेले श्री वामदेव महर्षीचा सुध्दा जन्म झाला. त्यांच्या जन्म समयी मातेच्या गर्भातून केवळ शिर बाहेर आले व चारी दिशेंचे अवलोकन करून पुन: गर्भात निघून गेले. तेंव्हा देवता व ऋषीगणांनी प्रार्थना केल्यावर श्री वामदेवानी पुन्हा जन्म घेतला. ते जन्मत: शुध्द ब्रह्मज्ञानी होते.
त्याचप्रमाणे श्रीपादांच्या जन्म समयी सुध्दा घडले. ते केवळ ज्योती स्वरूप होते. याप्रमाणे दोन वेळा जन्म घेतल्याने ते आजन्म द्विज होते. ते संपूर्ण, अखंड, अनंत, अद्वैत, सच्चिदानंदघन असल्या कारणाने या अवतारात त्यांना गुरू अशी व्युक्त नव्हती. वास्तवात, ते त्रिमूर्तीचे संयुक्त रूप नसून त्रैमूर्तीच्या अतीत असलेले एक विशिष्ट तत्व होते. म्हणून त्या त्रैमूर्तिस अतीत असलेले चतुर्थतत्व असल्याचे सुचविण्यासाठी त्यांनी चतुर्थीस अवतार घेतला. मातेच्या गर्भातून बाहेर येऊन पुन्हा गर्भस्थ झाले असता, महायोगी, सिध्द पुरुष व देवतांच्या प्रार्थनेस प्रसन्न होऊन पुन्हा जन्मल्यामुळे ते आजन्म ब्रह्मज्ञान संपन्न होते. चित्रा नक्षत्राचा अधिपति अंगारक (मंगळ) आहे. तो ग्रह पाप (नीच) स्थानी असता सकल जीव राशीस अमंगलप्रद ठरतो. सकल अमंगळाचे हरण करून शुभमंगलत्व प्रदान करण्यासाठी प्रभूंनी चित्रा नक्षत्रामध्ये जन्म घेतला. चित्रा नक्षत्र असतांना श्रीपाद प्रभुंचे पूजन केल्यास विशेष फलप्रद ठरते. श्रीपाद प्रभू साक्षात धर्मशास्ते आहेत. ते हरी-हरात्मज श्री अय्यप्पा स्वामी असल्याचे सुचविण्यासाठी त्यांनी तूळ राशीमधे जन्म घेतला. ते जाणत नाहीत असे धर्मशास्त्रच नाही. धर्म संकटात सापडलेल्या मनुष्याने त्यांची प्रार्थना केल्यास त्यास धर्म पथप्रदर्शनाचा लाभ होतो. सूर्य हा ग्रहांचा अधिपति आहे. सिंह लग्नामध्ये जन्म घेतल्यामुळे ते सकल विश्वाचे नाथ व दरबार भरण्यासाठी जन्म घेतलेले जणुकांही चक्रवर्तीच आहेत असे सूचित होते.
श्रीदत्तप्रभूपासून त्रिमूर्ती आणि त्रिमूर्तीपासून तीन कोटी देव व त्यांच्या पासून तेहतीस कोटी देवता उत्पन्न झाल्या. म्हणून केवळ श्रीदत्त नामस्मरणाने सकल देवतास्मरण केल्याचे फल प्राप्त होते.
श्री दत्ताची आराधना करीत असून श्रीपादांची निंदा करणाऱ्यांस रौरवादि नरकाची प्राप्ति होते. विषय न समजल्यास मौन धारण करणे उचित होय. पण त्या दिव्य भव्य अशा मंगल स्वरूपावर निंदापवाद लादणे योग्य नव्हे. त्यांच्या मुखांस मंगलारती करीत पायांवर खिळे ठेकणारे असे लोक सुखव्याधींनी ग्रस्त होतील. एवढेच नव्हे, श्री दत्तात्रेयांनी आपल्याअनुग्रहाने एका विचित्र अशा योगशक्तिचा समावेश केला. पुण्यवान जनांस केवळ नामस्मरणाने अप्रयत्नांने सर्व मनोरथ पूर्ण होत तर पापीजन श्रीपादांची निंदा केल्याने त्यांच्यावर नाना प्रकारचे विघ्न व अनिष्ट कोसळत. श्रीपादांचे अग्नि स्वरूप आहे. त्यांनी धारण केलेले अग्नि वस्त्र होय. ते पवित्र योगाग्नि स्वरूप असून त्यांच्या पादुकांचा महिमा वर्णन करण्यास युगेही कमी पडतील. वेद - उपनिषद सुध्दा त्यांच्या पादुकांचे वर्णनकरण्यास असमर्थ आहेत. किती युग झाले? किती कल्प लोटले? केवढे वेळा सृष्टी, स्थिति, लय क्रम पूर्ण झाले? पण श्री दत्त ते श्री दत्तच. ते अद्वितीय असून साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ आहेत! सृष्टीतील प्रत्येक अणु या परम सत्याचे साक्षीदार आहेत.

No comments:
Post a Comment