दत्तमूर्ती एकमुखी—दोन मुखी व त्रिमुखी
दत्तात्रेय हे मूळचे एकमुखीच असुन नंतरच्या विकासात त्यांचा त्रैमूर्तीचा प्रचार झाला. महाभारत, पुराणे, अर्वाचीन उपनिषदे यांतील दत्त एकमुखीच आहे. महान दत्तभक्त दासोपंत यांच्या दत्तमूर्तीचे ध्यान एकमुख सहा हात असे आहे.
भातगांव — नेपाळ येथे दत्तभक्त्त दलादन ऋषींनी तप केले .भगवान दत्तात्रेय प्रसन्न झाले व एकमुख व द्विभुज अशा स्वरूपात त्यास दर्शन दिले. ऋग्वेदात असलेल्या कथेत फक्त्त शिव आणा विष्णू यांनीच अत्रिऋषींच्या घरी जन्म घेतलेला आहे .त्यामुळे दोनमुखी दत्त म्हणजे अनुक्रमे दुर्वास व दत्त असे दोनमुखी दत्तस्वरूपपण मानले जाते. याचा उल्लेख अग्नीपुराणात आहे.
ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन देवांचा अवतार दत्तात्रेयांच्या रूपाने असल्याने त्यांना तीन मुख असल्याचू प्रसिद्ध आहे. सत्व—रज—तम , उत्पत्ती—स्थिती—लय, जागृती—स्वप्न—सुषुप्ती अशा तिहींच्या वर्णनाची परंपरा फार प्राचीन काळापासून आहे.
विद्वानांच्या म्हणण्यानुसार उपनिषदांच्या रचनाकालापर्यंत म्हणजे सुमारे इ.स. १००० पर्यंत दत्तात्रेय त्रिमूर्ती स्वरूप पावले नव्हते. परंतु गुरूचरित्राच्या काळापासुन त्रिमूर्तीची कल्पना लोकमानसात अधिक ठसलेली दिसते.
'त्रिगुणातामक त्रैमूर्ती दत्त हा जाणा' या प्रसिद्ध एकनाथकृत आरतीने तीन मुखी दत्तात्रेय्ंच्या मूर्तीचे स्वरूप निश्चित केलेले दिसते. तुकाराम महाराजांच्या तीन शिरे सहा हात । तया माझा दंडवत या अभंगात दत्तमूर्तीची तीन मुखीचीच कल्पना उचलून धरलेली आहे. आज किही अपवाद सोडल्यास सर्व मंदिरात तीन मुखीच दत्तमूर्ती आहे.
🙏श्री गुरूदेव दत्त🙏
No comments:
Post a Comment