------------
संत कबीर
------------
मात्र त्यांच्या मृत्यूसंबंधी पुढील तीन तिथी सांगितल्या जातात : १. माघ शुद्ध ११, संवत्सर १५७५ (इसवी सन १५१८), २. संवत्सर १५५२ (इसवी सन १४९५) आणि ३. मार्गशीर्ष शुद्ध ११, संवत्सर १५०५ (इसवी सन १४४८).
कबीर हे निर्गुणी भक्तिपरंपरेचे शिखर गाठलेले हिंदी भाषिक थोर संत होत. त्यांनी अवास्तव कर्मकांडावर घणाघाती हल्ला चढवून, ढोंगी लोकांचे बेगडी बुरखे फाडून टाकण्याचे काम केले.
संत कबीर यांचे जन्मगाव, विवाह, त्यांचे गुरू, आई-वडील, त्यांचे निर्वाण या कोणत्याही बाबतीत अभ्यासकांचे एकमत नाही. गोरखपूरजवळील मगहर हे त्यांचे जन्मगाव मानतात.
कबीरदास भारतातील एक महान कवी आणि समाजसुधारक होते. हिंदी साहित्याचे ते विव्दान होते. कबीर दास या नावाचा अर्थ महानतेशी जोडला गेला आहे ते अर्थातच भारतातील महान कवींपैकी एक होते. जेव्हां कधी भारतातील धर्म, भाषा, संस्कृतीची चर्चा होते त्यावेळी कबीरदासजींचे नाव सर्वात वर घेतले जाते कारण कबीरदासजीं नी आपल्या दोहयांच्या माध्यमातुन भारतिय संस्कृतीचा प्रसार प्रचार केला आहे या व्यतीरीक्त त्यांनी जीवनाशी निगडीत जे उपदेश केले आहेत त्यांना आत्मसात करून आपण आपले जीवन आदर्श बनवु शकतो.
संत कबीरांनी आपल्या दोहयांच्या माध्यमातुन समाजात पसरलेल्या अंधश्रध्दा, चालिरीतींना, भेदभावाला दुर करण्याचा प्रयत्न केला आहे.
संत कबीर हे एक महान कवि आणि समाज सुधारक होते. आपल्या साहित्याव्दारे त्यांनी लोकांना योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली या शिवाय समाजात पसरलेल्या कुप्रथांचा कडाडुन विरोध केला. साध्या राहाणीमानावर त्यांचा विश्वास होता ते अहिंसा, सत्य आणि सदाचारासारख्या गुणांचे पुरस्कर्ते होते. कबीरदासां सारख्या कविने भारतात जन्माला येणे ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
संत कबीरदास यांचे योगदान
कबीरदास यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातुन समाजात पसरेल्या कुप्रथांना चुकीच्या चालिरितींना दुर केले या शिवाय सामाजिक भेदभाव आणि आर्थिक शोषणाचा विरोध केला.
आज कबीर जयंती निमित्त काही प्रसिद्ध 'कबीर दोहे' तेही मराठी अर्थासहित :
१.
बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय,
जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय ।
अर्थ :
जेव्हा मी जगात ‘वाईट’ शोधायला निघालो तेव्हा मला तिळमात्र वाईट दिसलं नाही पण जेव्हा मी माझ्या अंतकरणात डोकावून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की जगात माझ्या पेक्षा कोणीच वाईट नाही.
२.
पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय,
ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय ।
अर्थ :
पोथी पुरण वाचून सगळेच काही विद्वान, ज्ञानी झाले नाहीत पण जर प्रेमाचे फक्त अडीच (ढाई) शब्द समजून घेतले म्हणजे प्रेमाचा खरा अर्थ समजून घेतला तर तुम्ही नक्कीच ज्ञानी व्हाल.
३.
साधु ऐसा चाहिए, जैसा सूप सुभाय,
सार-सार को गहि रहै, थोथा देई उड़ाय ।
अर्थ :
जसे धान्यातील खडे, कचरा पाखडण्यासाठी सूप वापरलं जातं तश्याच प्रकारच्या साधू, विद्वानांची गरज आहे जे समाजातील चांगल्या गोष्टीला टिकवून ठेवतील आणि नको असलेल्या गोष्टींना उडवून लावतील.
४.
धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय,
माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय ।
अर्थ :
माळीने झाडाला कितीही घडाभर पाणी टाकलं तरी ऋतू आल्यावरच त्याला फळे लागतात तसेच धैर्य ठेवून काम केल्यानेच सर्व काही सिद्धीस जाते असे कबीर म्हणतात.
५.
जाति न पूछो साधु की, पूछ लीजिये ज्ञान,
मोल करो तरवार का, पड़ा रहन दो म्यान ।
अर्थ :
ज्ञानी माणसाच्या जाती पेक्षा त्याचं ज्ञान महत्वाच आहे. यावेळी उपमा देतांना कबीर म्हणतात की तलवारीची किंमत करा त्याच्या म्यानाची नाही.
६.
दोस पराए देखि करि, चला हसन्त हसन्त,
अपने याद न आवई, जिनका आदि न अंत।
अर्थ :
माणसाच्या स्वभावाविषयी बोलताना कबीर म्हणतात की माणूस दुसऱ्यांचे दोष बघता बघता स्वतःचे दोष विसरतो ज्याचा कुठे अंतच नाही.
७.
रात गंवाई सोय के, दिवस गंवाया खाय ।
हीरा जन्म अमोल सा, कोड़ी बदले जाय ।
अर्थ :
रात्र झोपण्यात घालवली आणि दिवस खाण्यात, मनुष्य जन्म इतका अनमोल होता जो तू असा वाया घालवलास. आयुष्य सार्थकी न लावणाऱ्या जन्माची किंमत (मोल) शेवटी फक्त एका कवडी इतकी राहिली.
माहिती संदर्भ :- आंतरजाल
------------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
-------------------------------------------------
No comments:
Post a Comment